जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Warren Buffett Tips: हे काम नक्की करा, वॉरेन बफेंनी दिला श्रीमंतीचा गुरूमंत्र

Warren Buffett Tips: हे काम नक्की करा, वॉरेन बफेंनी दिला श्रीमंतीचा गुरूमंत्र

या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वॉरेन बफे यांचा एक व्हिडिओ (Warren Buffett video) पोस्ट केला आहे

या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वॉरेन बफे यांचा एक व्हिडिओ (Warren Buffett video) पोस्ट केला आहे

या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वॉरेन बफे यांचा एक व्हिडिओ (Warren Buffett video) पोस्ट केला आहे

    मुंबई, 28 जुलै : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे दानशूर वॉरेन बफे (Warren Buffett) हे गुंतवणूक क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. कित्येक लोक त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून गुंतवणूक क्षेत्रात प्रवेश करतात. शेअर मार्केटमधील बिग बुल म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. बफे हे आपल्या संपत्तीतील मोठा भाग दरवर्षी दान करतात. आपल्या मृत्यूनंतर आपली सगळी संपत्ती दान करण्याची तरतूद केली असल्याचीही घोषणा त्यांनी केली आहे. याच वॉरेन बफे यांनी युवकांना स्वतःची व्हॅल्यु वाढवण्यासाठी काही टिप्स (Warren Buffett Tips) दिल्या आहेत. याबाबतचा त्यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. लिंक्डइनवर पोस्ट केला व्हिडिओ कॅनडाची एक स्टार्टअप कंपनी व्हॉईस फ्लोचे को-फाउंडर मायकल हूड यांनी लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वॉरेन बफे यांचा एक व्हिडिओ (Warren Buffett video) पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये बफे यांनी युवकांना आपलं संवाद आणि लेखन कौशल्य चांगलं करण्याचा (Warren Buffett advice on Communication Skill) सल्ला दिला आहे. या माध्यमातून कोणतीही व्यक्ती स्वतःची व्हॅल्यु 50 टक्क्यांनी वाढवू शकते, असं बफे सांगतात. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. तरुणांना दिला महत्त्वाचा सल्ला “आपल्या संवाद कौशल्य आणखी चांगलं करणं गरजेचं आहे. यामध्ये लिहिणं आणि बोलणं या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. तुम्हाला नीट संवाद साधता न येणं, हे असं आहे जणू तुम्ही अंधारात एखाद्या मुलीला डोळ्यांनी इशारे करत आहात. याचा काहीच फायदा होत नाही. तुमच्याकडे संपूर्ण जगाचं ज्ञान असेल, मात्र ते जर तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता आलं नाही तर ते बिनकामाचंच ठरतं. उत्तम संवाद कौशल्याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःची व्हॅल्यु 50 टक्क्यांपर्यंत वाढवू शकता,” असं बफे या व्हिडिओमध्ये (Warren Buffett advice for Youngsters) सांगतात. ‘बफे पॉवर लंच’ चर्चेत वॉरेन बफे हे सध्या जगातील सातव्या क्रमांकाची सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची एकूण नेट वर्थ सध्या 99.8 बिलियन डॉलर्सएवढी आहे. बर्कशायर हॅथवे कंपनीचे सीईओ असलेले बफे हे आपल्या दानशूपरणासाठी प्रसिद्ध आहेत. दरवर्षी ते अब्जावधींची संपत्ती दान करतात, ज्यामुळे श्रीमंतांच्या यादीतील त्यांचं स्थान वेळेवेळी खाली येतं. चॅरिटीसाठी म्हणून ते दरवर्षी ‘बफे पॉवर लंच’ (Buffett Power Lunch) हा उपक्रम राबवतात. यामध्ये एखादी श्रीमंत व्यक्ती मोठी बोली लावून बफे यांच्यासोबत जेवणाचा आनंद घेते. या बोलीमध्ये लावण्यात आलेली रक्कम चांगल्या कामासाठी दान केली जाते. ईबे (Ebay) आणि ग्लाईड फाउंडेशनने (Glide Foundation) या वर्षी आयोजित केलेल्या बफे पॉवर लंचला तब्बल 148.34 कोटींची बोली लागली आहे. 12 जूनपासून हा लिलाव सुरू झाला होता, त्यानंतर आतापर्यंत हीच सर्वात मोठी बोली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात