Home /News /money /

Gold Price Today: सलग झालेल्या वाढीनंतर आज सोन्याचांदीमध्ये घसरण, वाचा नवे दर

Gold Price Today: सलग झालेल्या वाढीनंतर आज सोन्याचांदीमध्ये घसरण, वाचा नवे दर

Gold Silver Price, 22nd December 2020: गेले काही दिवस सोन्याचांदीच्या किंमती वाढत आहे. सोन्याने पुन्हा एकदा 50 हजाराचा आकडा पार केला होता. दरम्यान आज या वाढीला काहीसा ब्रेक लागला आहे

    नवी दिल्ली, 22 डिसेंबर: देशांतर्गत बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या किंमतीचा ग्राफ चढता आहे. दरम्यान मंगळावारी या दरवाढीला काहीसा ब्रेक लागला आहे. दिल्लीतील सराफा बाजारात 22 डिसेंबर 2020 रोजी सोन्याचे दर (Gold Price Today) प्रति तोळा 243 रुपयांनी कमी झाले  आहेत. या घसरणीनंतर सोन्याचे दर पुन्हा एकदा 50000 रुपयांच्या खाली आले आहेत. तर चांदीच्या किंमतीतही किरकोळ घसरण पाहायला मिळाली. एक किलो चांदीच्या किंमतीत आज (Silver Rates Today) 216 रुपयांची घसरण  झाली आहे. याआधीच्या सत्रात दिल्लीतील सोन्याचे दर 49,896  रुपये प्रति तोळावर ट्रेड करणं बंद झालं होतं, तर चांदी  67,339  रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती उतरल्यामुळे देशांतर्गत बाजारातही किंमतीवर परिणाम झाला आहे. सोन्याचे नवे दर (Gold Price on 22nd December 2020) दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचे दर 243 रुपये प्रति तोळाने कमी झाले आहेत. यानंतर 99.9  शुद्धतेच्या सोन्याची किंमत 49,653 रुपये प्रति तोळा झाली आहे. याआधीच्या सत्रामध्ये सोन्याचे दर  49,896 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून 1,868 डॉलर प्रति औंस आहेत. याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य कमी झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. (हे वाचा-Bank Holidays: 3 दिवस बंद राहणार बँका,खोळंबा टाळण्यासाठी पूर्ण करून घ्या कामं) चांदीचे नवे दर  (Silver Price on 22nd December 2020) सोन्यापाठोपाठ आज चांदीमध्येही किरकोळ घसरण  झाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी चांदीच्या दरांत 216 रुपयांची घसरणा झाली आहे. यानंतर चांदीचे दर प्रति किलो 67,177  रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात  (International Market)चांदीचे भाव  25.70 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते. (हे वाचा-भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्याचे संकेत, शेअर बाजारात कोट्यवधींची परदेशी गुंतवणूक) का झाली सोन्याचांदीच्या दरात घसरण? मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस (Motilal Oswal Financial Services) चे व्हाइस प्रेसिडेंट (कमोडिटीज) नवनीत दमानी यांच्या मते, सोन्याचांदीच्या आंतरराष्ट्रीय किंमतीमध्ये घसरण झाल्यामुळे भारतीय बाजारात देखील त्याचा परिणाम पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये आज सोन्यामध्ये तेजी होती, त्यानंतर सोन्यावर नफावसूलीचा दबाव वाढला. याशिवाय अमेरिकेत 900 अब्ज डॉलर्सच्या आर्थिक पॅकेजला मंजुरी मिळाली आहे. या सर्व कारणांचा परिणाम सोन्याचांदीच्या किंमतीवर होत आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या