मुंबई, 13 सप्टेंबर : छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) चे गेल्या नऊ तिमाहींचे स्थिर व्याजदर लवकरच वाढू शकतात. सध्या, PPF वर वार्षिक 7.1% व्याज मिळत आहे. सरकारी सिक्युरिटीजवरील व्याजदरात सातत्याने वाढ होत आहे आणि हे पाहता पीपीएफवरील व्याजातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारी बाँडवर सध्याचा व्याजदर 7.3 टक्के आहे, जो पीपीएफपेक्षा जास्त आहे. जानेवारी 2022 मध्ये सिक्युरिटीजवरील व्याजदर 6.5 टक्के आणि जूनमध्ये 7.6 टक्के होता. सप्टेंबरपर्यंत सलग नऊ तिमाहीत लघु बचत योजनांवरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी बाँड्सवर व्याजदर वाढल्यानंतर पीपीएफसह अनेक लहान बचत योजनांचे व्याजदर नकारात्मक झाले आहेत. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या बैठकीत त्यांचे व्याजदर वाढवणे जवळपास निश्चित झाले आहे. एकापेक्षा जास्त पॅनकार्ड वापरत असाल तर सावध व्हा; मोठा दंड भरावा लागू शकतो सिक्युरिटीज आणि PPF यांचा काय संबंध? सरकारी बाँड्सचे व्याजदर आणि पीपीएफ यांचा थेट संबंध आहे. PPF वर सिक्युरिटीजच्या सरासरी व्याजदरापेक्षा 1 टक्के जास्त व्याज देण्याची तरतूद आहे. सरकार दर तिमाहीत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेते. सरकारी बाँड्सचे बाजारातील उत्पन्न जेवढे जास्त असेल, पीपीएफसारख्या लहान बचत योजनांचे व्याजदरही त्याच प्रमाणात वाढतात.
इतर बचत योजनांवरही लाभ मिळेल
PPF सोबतच, गुंतवणूकदारांना इतर लहान बचत योजनांचे व्याजदर वाढवण्याची भेट मिळू शकते. यामध्ये नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र (KVP), फिक्स्ड डिपॉझिट, PPF, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि सुकन्या समृद्धी योजनेवरही व्याजदर वाढवले जाऊ शकतात. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. PPF च्या बाबतीत, व्याजदर सरासरी उत्पन्नापेक्षा 25 बेसिस पॉइंट्स जास्त असू शकतो. जर एका तिमाहीत सरकारी सिक्युरिटीजचे सरासरी उत्पन्न 6.75 टक्के असेल, तर पुढील तिमाहीसाठी पीपीएफचा व्याज दर 25 बेस पॉइंट्स जास्त, म्हणजे 7 टक्के असावा. उत्पन्नात घट झाली तरी व्याजदर कमी झाला नाही सिक्युरिटीजचे उत्पन्न आणि PPF व्याजदर यांच्यात थेट संबंध असूनही, उत्पन्न घटले तरीही सरकारने व्याजदरात कपात केली नाही. महामारीच्या काळात जेव्हा सरकारी बाँड्सचे उत्पन्न घटले, तेव्हा सरकारने PPF, NSC आणि इतर लहान बचत योजनांच्या व्याजदरात कपात केली नाही.