मराठी बातम्या /बातम्या /मनी /

डी कोल्ड टोटल, विक्स अॅक्शन 500 अ‍ॅडव्हान्ससह 19 औषधांवर बंदीची टांगती तलवार, काय आहे कारण?

डी कोल्ड टोटल, विक्स अॅक्शन 500 अ‍ॅडव्हान्ससह 19 औषधांवर बंदीची टांगती तलवार, काय आहे कारण?

एकापेक्षा जास्त औषधांचे मिश्रण असलेल्या सिरप किंवा टॅब्लेटला FDC किंवा कॉकटेल औषध म्हणतात. कॉकटेल औषधाच्या वाढत्या वापराचे काही दुष्परिणाम दिसून आले आहेत.

    नवी दिल्ली : सर्दी, ताप यासारख्या साधारण आजारात आपण मेडिकलमध्ये जाऊन काही गोळ्या विकत घेतो आणि खातो. काही औषधांची नावं तर अनेकांना पाठ आहेत. अशाच काही कफ सिरप आणि औषधांवर केंद्र सरकार लवकरच बंदी घालू शकते. ही अशी औषधे आहेत ज्यात सिरप किंवा टॅब्लेटमध्ये एकापेक्षा जास्त औषधे असतात. त्यांना फिक्स्ड ड्रग कॉम्बिनेशन (FDCs) म्हणतात. सामान्य भाषेत याला कॉकटेल औषध असेही म्हणतात. विकसित देशांमध्ये एकापेक्षा जास्त औषधांचे मिश्रण करून तयार केलेल्या औषधांच्या विक्रीवर बंदी आहे. आता भारताने अशा 19 सिरप आणि गोळ्यांची यादी तयार केली आहे, ज्यावर लवकरच बंदी घातली जाऊ शकते. News18.com मधील एका वृत्तानुसार, डॉ. एम.एस. भाटिया, प्राध्यापक आणि प्रमुख, मानसोपचार विभाग, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस यांच्या अध्यक्षतेखालील तज्ञ समितीने केंद्रीय औषध मानक आणि नियंत्रण संघटनेकडून 19 FDC ची यादी तयार केली. ही यादी आता आरोग्य मंत्रालयाला देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. 5G सेवा ऑक्टोबरपासून सुरु होण्याची शक्यता, तुमचं शहर पहिल्या लिस्टमध्ये आहे का? चेक करा बंदी घालण्याचा विचार का होत आहे? एकापेक्षा जास्त औषधांचे मिश्रण असलेल्या सिरप किंवा टॅब्लेटला FDC किंवा कॉकटेल औषध म्हणतात. कॉकटेल औषधाच्या वाढत्या वापराचे काही दुष्परिणाम दिसून आले आहेत. अँटिबायोटिक कॉकटेल औषधांच्या जास्त वापरामुळे अँटिबायोटिक परिणामकारकता कमी होण्याचा धोका आहे. यामुळेच आता सरकारने कॉकटेल ड्रग्जवर कडक भूमिका घेतली आहे. Health Tips: डिप्रेशन दूर करण्यासाठी 'हे' पदार्थ अजिबात खाऊ नका या औषधांवर बंदी घातली जाऊ शकते तज्ञ समितीने लिस्ट केलेल्या 19 एफडीसीमध्ये सुमो, निसिप, डी कोल्ड टोटल, विक्स अॅक्शन 500 अॅडव्हान्स्ड, कफ सिरप टेडीकॉफ, ग्रिलिंक्टस, कोडीस्टार, टॉसेक्स, एस्कोरिल सी, पिरिटन एक्सपेक्टोरंट आणि अँटीबायोटिक क्लिंडामायसिन यांचा समावेश आहे. या औषधांचे उत्पादन करणार्‍या फार्मा कंपन्यांमध्ये अल्केम, सिप्ला, रेकिट बेंकिसर, प्रॉक्टर अँड गॅम्बल, मॅनकाइंड फार्मा, अॅबॉट, ग्लेनमार्क आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाइन यांचा समावेश आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Central government, Medical, Medicine

    पुढील बातम्या