जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Domestic Flights: आणखी महागला विमानाचा प्रवास, देशांतर्गत उड्डाणांच्या भाड्यात वाढ

Domestic Flights: आणखी महागला विमानाचा प्रवास, देशांतर्गत उड्डाणांच्या भाड्यात वाढ

Domestic Flights: आणखी महागला विमानाचा प्रवास, देशांतर्गत उड्डाणांच्या भाड्यात वाढ

शुक्रवारपासून देशांतर्गत उड्डाणांच्या (Domestic Flights) भाड्यामध्ये सरकारनं ५ टक्के वाढ केली आहे. विमान इंधनाच्या दरांमध्ये सतत वाढ होत असल्यानं हा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 20 मार्च : महागाईनं हैराण झालेल्या सामान्य जनतेला आता आणखी एक मोठा झटका सरकारनं दिला आहे. शुक्रवारपासून देशांतर्गत उड्डाणांच्या (Domestic Flights) भाड्यामध्ये सरकारनं ५ टक्के वाढ केली आहे. नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. पुरी यांनी सांगितलं, की विमान इंधनाच्या दरांमध्ये सतत वाढ होत असल्यानं ही गोष्ट लक्षात घेतचं देशांतर्गात उड्डाणांच्या भाड्यात पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. या कारणामुळे आता विमानाचा प्रवास काही प्रमाणात महाग होणार आहे. पुरी यांनी सांगितलं, की विमान प्रवासाच्या बहुतेक भाड्यामध्ये बदल केला गेला नाही. यापूर्वी एकच महिना आधी सरकारनं विमानांच्या किमान भाड्यातत १० टक्के आणि कमाल भाड्यात तीस टक्क्यांची वाढ केली होती. मागील वर्षी मे महिन्यात शेड्यूल देशांतर्गत उड्डाणे पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा करत देशांतर्गत विमानांच्या प्रवासाच्या कालावधीनुसार सात स्तरांमध्ये विभाजन केलं गेलं होतं. यात ४० मिनीट, ४० ते ६० मिनीट, ६० ते ९०, ९० ते १२०, १२० ते १५०, १५० ते १८० आणि १८० ते २१० या वेळांप्रमाणं भाडं ठरवलं गेलं होतं. दोन महिन्यात पाच वेळा वाढले दर - १ डिसेंबरनंरतर विमानाच्या इंधनाचे दर पाच वेळा वाढले आहेत. १ डिसेंबरला याचे दर ७.६ टक्क्यांनी म्हणजेच 3288.38 रुपये प्रति किलोलीटरनं वाढले. 16 डिसेंबरला 6.3 टक्क्यांनी म्हणजेच 2941.5 रुपये प्रति किलोलीटरनं वाढले आणि एक जनवरीला 3.69 टक्के म्हणजेच 1817.62 रुपये प्रति किलोलीटरनं वाढले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात