जाहिरात
मराठी बातम्या / मनी / खूशखबर! या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता, यानंतर इतका होणार DA

खूशखबर! या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता, यानंतर इतका होणार DA

जुलै महिन्यातली DA वाढ पुढे ढकली

जुलै महिन्यातली DA वाढ पुढे ढकली

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) लवकरच एक खूशखबर मिळू शकते. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) चार टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी  दिल्‍ली, 09 फेब्रुवारी**:**  केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) लवकरच एक खूशखबर मिळू शकते.  केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) चार टक्क्यांची वाढ करण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचारी गेले अनेक दिवस या घोषणेची आतुरतेनं वाट पहात होते; त्यांची ही प्रतीक्षा आता संपण्याची चिन्हे आहेत. त्यामुळं केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. या घोषणेचा लाभ केंद्र सरकारचे 50 लाख कार्यरत कर्मचारी आणि 61 लाख निवृत्त कर्मचारी (Pensioners) यांना होणार आहे. कामगार मंत्रालयानं ऑल इंडिया कंज्यूमर प्राइस इंडेक्सची (एआयसीपीआय-AICPI) घोषणा केली आहे. त्यामुळं आता महागाई भत्तादेखील वाढवून मिळेल, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे. ऑल इंडिया कंज्यूमर प्राइस इंडेक्सवरूनच (एआयसीपीआय) महागाई भत्त्याचा दर ठरवला जातो. प्रवास भत्त्यातही चार टक्के वाढीची शक्यता ऑल इंडिया कंज्यूमर प्राइस इंडेक्सच्या आधारे (एआयसीपीआय) प्रवास भत्त्यातही (Traveling Allowance) चार टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचाही चांगला फायदा कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ झाली, तर त्यांच्या प्रवास भत्त्यातदेखील चार टक्के वाढ होईल. (हे वाचा- CM केजरीवालांच्या मुलीची OLX वर फसवणूक, ऑनलाइन सोफा विकताना 34000 रुपयांचा गंडा ) अर्थात केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जुलै 2020 ते 1 जानेवारी 2021 पर्यंत महागाई भत्ता दिला जाणार नाही. कोरोना साथीमुळे (Corona Pandemic) एप्रिल 2020 मध्ये केंद्रसरकारनं महागाई भत्ता थांबवण्याची घोषणा केली होती. जून 2021 पर्यंत महागाई भत्ता मिळणार नसल्याचं केंद्रानं स्पष्ट केलं होतं.. वाढीनंतर महागाई भत्ता होणार 21 टक्के केंद्रीय कर्मचार्‍यांना सध्या महागाई भत्ता आणि डियरनेस रिलीफ (DR) दिले जात नाहीत. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 17 टक्के महागाई भत्ता मिळतो.  यात 4 टक्के वाढ झाल्यास तो 21 टक्के होईल आणि प्रवास भत्ताही चार टक्के वाढेल. यामुळं सद्य कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे. मूळ पगारावर (Basic Salary) महागाई भत्ता दिला जातो. कर्मचाऱ्यांना महागाईमुळे (Inflation) होणाऱ्या खर्चातील वाढ सोसता यावी, या उद्देशानं महागाई भत्ता दिला जातो. याची घोषणा वर्षांतून दोन वेळा जानेवारी आणि जुलैमध्ये केली जाते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात