मराठी बातम्या /बातम्या /मनी /Economy साठी Good News : भारताच्या पतमानांकनात सुधारणा, असा झाला बदल

Economy साठी Good News : भारताच्या पतमानांकनात सुधारणा, असा झाला बदल

कोरोना काळानंतर भारताच्या पतमानांकनात सुधारणा झाली आहे. फिच रेटिंग्ज (Fitch Ratings) या आंतरराष्ट्रीय एजन्सीनं भारताच्या सोवरीन रेटिंग आऊटलूकला अर्थात पतमानांकनाला स्थिर दर्जा (Stable) दिला आहे.

कोरोना काळानंतर भारताच्या पतमानांकनात सुधारणा झाली आहे. फिच रेटिंग्ज (Fitch Ratings) या आंतरराष्ट्रीय एजन्सीनं भारताच्या सोवरीन रेटिंग आऊटलूकला अर्थात पतमानांकनाला स्थिर दर्जा (Stable) दिला आहे.

कोरोना काळानंतर भारताच्या पतमानांकनात सुधारणा झाली आहे. फिच रेटिंग्ज (Fitch Ratings) या आंतरराष्ट्रीय एजन्सीनं भारताच्या सोवरीन रेटिंग आऊटलूकला अर्थात पतमानांकनाला स्थिर दर्जा (Stable) दिला आहे.

  नवी दिल्ली, 10 जून : कोरोना काळानंतर भारताच्या पतमानांकनात सुधारणा झाली आहे. फिच रेटिंग्ज (Fitch Ratings) या आंतरराष्ट्रीय एजन्सीनं भारताच्या सोवरीन रेटिंग आऊटलूकला अर्थात पतमानांकनाला स्थिर दर्जा (Stable) दिला आहे. आधी भारताचं पतमानांकन नकारात्मक अर्थात ‘निगेटिव्ह’ (Negative) होतं. त्याला आता ‘बीबीबी’ (BBB) चा दर्जा देण्यात आला आहे. मात्र चालू आर्थिक वर्षात (2022-23) भारताच्या विकासदरात (GDP) घट होऊन तो 7.8 टक्के राहील असा अंदाज वर्तवला आहे. याआधी हा विकासदर 8.5 टक्के राहील अशी आशा होती. जागतिक कमॉडिटी मार्केटमध्ये झालेल्या दरवाढीमुळे महागाईत वाढ झाली व त्यामुळे विकासदराच्या अंदाजात घट नोंदवली गेली आहे.

  विकासदरात घट होण्याची जोखिम कमी झाली

  भारतातील गतिमान आर्थिक सुधारणांमुळे मीडियम टर्ममधील विकासदर कमी होण्याची जोखीम कमी झाली आहे. त्यामुळेच भारताच्या आऊटलूकला स्थिर ठेवण्यात आलं आहे, असं एजन्सीनं आज (10 June 2022) म्हटलं आहे. “जागतिक कमॉडिटी मार्केटमधील दरांमध्ये भरपूर वाढ होऊनही भारतातील आर्थिक सुधारणा आणि आर्थिक सेवांमधील उणीवा कमी झाल्या असल्यानं मीडियम टर्ममधील विकासदरांत घट होण्याची शक्यता कमी झाली आहे.” असं रेटिंग एजन्सीनं सांगितलं आहे.

  प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत भारताचा मधल्या टप्प्यातील (Medium Term Growth) चांगला विकास आऊटलूक रेटिंगच्या दृष्टिने महत्त्वाचा ठरला आहे. तसंच त्यामुळे पतमानांकनातील वाढ टिकून राहील, असं फिचनं म्हटलं आहे. आर्थिक वर्ष 2024 ते 2027 दरम्यान भारताच्या विकासदरात जवळपास 7 टक्क्यांची वाढ होण्याचा आमचा अंदाज आहे, असंही एजन्सीनं सांगितलं आहे.

  सरकार पायाभूत आराखडा मजबूत करण्यासाठी, आर्थिक सुधारणा करण्यासाठी आणि आर्थिक क्षेत्रावरील दबाव कमी करण्यासाठी प्रयत्न करेल, याचा हे मानांकन देनाना विचार करण्यात आला आहे. तरीही पायाभूत सुविधांवरील खर्च आणि आर्थिक सुधारणा करण्यात तसंच अर्थव्यवस्थेच्या सबलीकरणासंदर्भातील भविष्यातील बदल या मानांकनासाठी आव्हानात्मक ठरू शकतो.

  गेल्या दोन वर्षांपासून निगेटिव्ह असलेल्या भारताच्या पतमानांकनात आता सुधारणा करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत देशातील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराला चालना देणारे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचाही हा परिणाम असू शकतो. कोरोनानंतर आता उद्योगांचं चक्र वेगाने फिरू लागलं आहे त्यामुळे भारताच्या पतमानांकनालाही बळ मिळाल आहे. विकास दर कायम राखल्यास अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी सुधारेल. तूर्तास पतमानांकनातील सुधारणा ही पण देशवासीयांसाठी आनंदाची बातमी आहे.

  First published:

  Tags: Economy, Gdp, Negative test