मराठी बातम्या /बातम्या /मनी /

घर खरेदी करणाऱ्यांसाठी Good News,Home Loanचं आता नो टेन्शन; 'या' बँकेकडून व्याजदरात घट

घर खरेदी करणाऱ्यांसाठी Good News,Home Loanचं आता नो टेन्शन; 'या' बँकेकडून व्याजदरात घट

स्वतःचं घर ( own house ) असावं, हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. जर तुम्हीही घर घेण्यासाठी गृह कर्ज (Home Loan) घेण्याचा विचार करत असाल, तर आता तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.

स्वतःचं घर ( own house ) असावं, हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. जर तुम्हीही घर घेण्यासाठी गृह कर्ज (Home Loan) घेण्याचा विचार करत असाल, तर आता तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.

स्वतःचं घर ( own house ) असावं, हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. जर तुम्हीही घर घेण्यासाठी गृह कर्ज (Home Loan) घेण्याचा विचार करत असाल, तर आता तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे.

नवी दिल्ली, 13 डिसेंबर: स्वतःचं घर ( own house ) असावं, हे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. जर तुम्हीही घर घेण्यासाठी गृह कर्ज (Home Loan) घेण्याचा विचार करत असाल, तर आता तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) ने गृहकर्जावरील व्याजदरात ( interest rates ) कपात केली आहे. बँकेचे नवे दर ( new rates ) 13 डिसेंबर 21 पासून लागू होतील.

बँक ऑफ महाराष्ट्रने गृहकर्जावरील व्याजदर कमी करीत ते 6.40 टक्क्यांवर आणण्याची घोषणा केली आहे. हा दर आतापर्यंतचा सर्वांत कमी दर आहे. सध्या बँक 6.80 टक्के व्याजाने गृहकर्ज देत आहे. बाजारातील स्पर्धा पाहता बँकेने कार कर्जावरील व्याजदर 7.05 टक्क्यांवरून 6.80 टक्क्यांवर आणले आहेत.

हेही वाचा-  Amazon Prime Membership उद्यापासून महागणार! कमी किंमतीत खरेदी करण्याचा आज शेवटचा दिवस

 रिटेल बोनान्झा फेस्टिव्ह धमाका (Retail Bonanza Festive Dhamaka) ऑफर अंतर्गत व्याजदरात कपात करण्यात आली आहे. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ए एस राजीव म्हणाले की, 'ही ऑफर ग्राहकांना त्यांच्या कर्जावर अधिक बचत करण्यास मदत करेल.'

एसबीआय ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या गृहकर्जाच्या टॉप-अप कर्जावर विशेष ऑफर आणली आहे. बँकेने टॉप-अप कर्जाच्या व्याजदरावर 0.25 टक्के सूट देण्याव्यतिरिक्त कोणतीही प्रोसेसिंग फी न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. टॉप-अप गृहकर्ज मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नासाठी किंवा अतिरिक्त मालमत्तेच्या खरेदीसाठीही वापरले जाऊ शकते. कर्जाच्या परतफेडीबरोबरच टॉप-अप कर्जाचे मासिक हप्तेही भरावे लागतात.

हेही वाचा- Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत तेजी, काय आहे आजचा भाव

स्वत:चे घर असावे ही प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. घर विकत घेणे हा आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाचा निर्णय असतो. स्वतःच्या कुटुंबासाठीची ही एक सर्वोत्तम गोष्ट असते. घर खरेदी करताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. आपण जेथे घर खरेदी करीत आहोत तेथून शाळा, बसस्थानक, रेल्वेस्थानक, सरकारी कार्यालये, प्रमुख रस्ते आदींचे अंतर किती आहेत,याची माहिती घेतली जाते. घराची किंमत बजेटमध्ये आहे का, पैशांची जुळवाजुळव कशी करायची, कोणत्या बँकेत गृह कर्जाचे प्रकरण टाकायचे आदींचा विचार केला जातो. सध्या कोरोनाचा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. बांधकाम क्षेत्राला देखील याचा मोठा फटका बसला आहे. पण सध्या बँकेने गृह कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे तुमचे घर खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच सुवर्ण संधी आहे.

First published:

Tags: Home Loan, State bank of india