नवी दिल्ली, 13 डिसेंबर: सोन्याच्या दरात किरकोळ (Gold Price Today) वाढ झाली आहे. आज सोमवारी MCX वर सोन्याची वायदे किंमत (Gold Price today on MCX) 48172 रुपये प्रति तोळावर पोहोचली आहे. दुसरीकडे चांदी 0.30 टक्क्यांनी वाढून 61,335 प्रति किलोवर आहे. सोन्याचे दर आज जरी वाढले असले तरीही सोने गेल्यावर्षीच्या विक्रमी उच्चांकापेक्षा स्वस्त आहे. रविवारी सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,780 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा भाव 61,200 रुपये प्रति किलो होता. विक्रमी किंमतीपेक्षा सुमारे 8000 रुपये स्वस्त गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या किमतीने आतापर्यंतचा उच्चांक (Gold Rates on Record High) गाठला होता. ऑगस्ट 2020 मध्ये सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 56,200 रुपये होती. आज दर 48172 रुपये प्रति तोळा आहेत. अर्थात रेकॉर्ड हायपेक्षा सोनं आज जवळपास 8000 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. हे वाचा- नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर! ही कंपनी करणार 600 जणांची भरती महाराष्ट्रातील विविध शहरात आज 24 कॅरेट सोन्याचा दर 47 हजारांपेक्षा जास्त आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव देखील 46 हजारांपेक्षा जास्त आहे. गुड रिटर्न्स आणि बँक बझार या वेबसाइट्सनुसार जाणून घ्या महाराष्ट्रातील विविध शहरातील सोन्याचा दर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 24 कॅरेट सोन्याचा दर
शहर | आजचा दर (प्रति तोळा) | कालचा दर (प्रति तोळा) |
---|---|---|
मुंबई | 47770 रुपये | 47780 रुपये |
पुणे | 49,570 रुपये | 49,560 रुपये |
नाशिक | 49,570 रुपये | 49,560 रुपये |
नागपूर | 47770 रुपये | 47780 रुपये |
औरंगाबाद | 48580 रुपये | 48580 रुपये |
कोल्हापूर | 48580 रुपये | 48580 रुपये |
लातूर | 48580 रुपये | 48580 रुपये |
सांगली | 48580 रुपये | 48580 रुपये |
नांदेड | 48580 रुपये | 48580 रुपये |
जळगाव | 48580 रुपये | 48580 रुपये |
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचा दर
शहर | आजचा दर (प्रति तोळा) | कालचा दर (प्रति तोळा) |
---|---|---|
मुंबई | 46770 रुपये | 46780 रुपये |
पुणे | 46,270 रुपये | 46,260 रुपये |
नाशिक | 46,270 रुपये | 46,260 रुपये |
नागपूर | 46770 रुपये | 46780 रुपये |
औरंगाबाद | 46270 रुपये | 46270 रुपये |
कोल्हापूर | 46270 रुपये | 46270 रुपये |
लातूर | 46270 रुपये | 46270 रुपये |
सांगली | 46270 रुपये | 46270 रुपये |
नांदेड | 46270 रुपये | 46270 रुपये |
जळगाव | 46270 रुपये | 46270 रुपये |
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा भाव सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.