जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold and Silver Latest Prices: धनत्रयोदशीआधी सोनंचांदीच्या दरात मोठी घसरण, वाचा नवे दर

Gold and Silver Latest Prices: धनत्रयोदशीआधी सोनंचांदीच्या दरात मोठी घसरण, वाचा नवे दर

Gold and Silver Latest Prices: धनत्रयोदशीआधी सोनंचांदीच्या दरात मोठी घसरण, वाचा नवे दर

Gold price today: बुधवारी देखील सोन्याचांदींच्या दरात काहीशी कमजोरी पाहायला मिळाली. एमसीएक्सवर गोल्ड फ्यूचरमध्ये 91 रुपये म्हणजेच 0.18 टक्क्यांची घसरण झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 11नोव्हेंबर: कोरोना व्हायरस लशीसंदर्भात सकारात्मक बातमी आल्यानंतर बुधवारी देखील सोन्याचांदीच्या दरात (Gold silver price today) कमजोरी पाहायला मिळाली.  कमोडिटी एक्सचेंज MCX वर गोल्ड फ्यूचर्स (Gold Futures) मध्ये 91 रुपये अर्थात 0.18 रुपयांची घसरण झाल्यानंतर दर 50,410 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. सिल्ह्वर फ्यूचर्समध्ये देखील 287 रुपयांची घसरण झाली आहे. या 0.34 टक्क्यांच्या घसणीनंतर चांदीचे दर 62,832 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहेत. 10 नोव्हेंबर रोजी सोन्याचांदीच्या किंमतीत भारतीय बाजारात तेजी पाहायला मिळाली. कोरोना व्हायरस लशीसंदर्भातील बातमीमुळे सोन्याचांदीचे दर घसरले सोमवारी कोरोना व्हायरस लशी संदर्भात बातमी समोर आल्यानंतर सोने आणि चांदीमध्ये चांगली विक्री पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांनी सोन्यातील पैसे काढून स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे. तज्ज्ञांच्या मते प्रॉफिट बुकिंगमुळे सोन्यामध्ये आणि चांदीच्या किंमतीमध्ये घसरण आली आहे. मात्र लाँग टर्मच्या हिशोबाने याचे मुल्य कायम आहे. मनीकंट्रोलच्या बातमीनुसार मार्केट तज्ज्ञ असा सल्ला देत आहेत की, गुंतवणूकदार प्रत्येत घसरणीनंतर सोनेखरेदी करू शकतात. सोन्याची सपोर्ट लेव्हल 50 हजार रुपये प्रति तोळावर कायम आहे. कमजोर डॉलरमुळे सोन्याला मिळू शकतो सपोर्ट Prithvi Finmart चे डायरेक्टर मनोज जैन यांच्या मते अमेरिकेत आर्थिक पॅकेजसंदर्भात आशा वाढल्याने आणि डॉलरमध्ये कमजोरी आल्याने सोन्याच्या किंमतींना सपोर्ट मिळू शकतो. त्यांनी पुढे असे म्हटले की, MCX वर सोन्याची सपोर्ट लेव्हर  50330-50000 राहू शकते. तर त्याचे रेजिस्टन्स 50800-51000 या लेव्हलवर राहू शकते. मंगळवारी देखील उतरले होते सोन्याचांदीचे दर मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर 662 रुपयांनी घसरुन 50,338 प्रति 10 ग्रॅम इतका झाला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे भाव घसरुन 1881 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होते. एक किलोग्रॅम चांदीचे दर 1431 रुपयांनी कमी होऊन दर 62,217 प्रति किलोग्रॅम इतका होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचा दर 24.31 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होते. त्यामुळे दिवाळीआधी काहीशा कमी दराने सोनेखरेदी करण्याची संधी ग्राहकांकडे आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात