LPG सिलेंडरसाठी देखील आहे Insurance Cover, मिळू शकतो 30 लाखांपर्यंत फायदा

LPG Cylinder Insurance Cover: एलपीजी सिलेंडरची दूर्घटना झाल्यास इन्शूरन्स कव्हरचा फायदा घेतला जाऊ शकतो. याअंतर्गत कुटुंबातील सदस्य जखमी झाल्यास, त्यांचा मृत्यू झाल्यास किंवा घरातील मालमत्तेचे नुकसान झाल्यास कव्हर मिळतो.

LPG Cylinder Insurance Cover: एलपीजी सिलेंडरची दूर्घटना झाल्यास इन्शूरन्स कव्हरचा फायदा घेतला जाऊ शकतो. याअंतर्गत कुटुंबातील सदस्य जखमी झाल्यास, त्यांचा मृत्यू झाल्यास किंवा घरातील मालमत्तेचे नुकसान झाल्यास कव्हर मिळतो.

  • Share this:
    नवी दिल्ली, 22 ऑगस्ट: भारतामध्ये सर्वाधिक संख्येने घरामध्ये LPG गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. मात्र एलपीजी गॅस सिलेंडर वापरताना सावधानता बाळगली नाही तर दूर्घटना होण्याचा धोका असतो. LPG गॅस सिलेंडर दुर्घटनेमध्ये जखमी होण्याची किंवा एखाद्याचा मृत्यू होण्याची भीती असते. तसंच घरातील मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. अशावेळी एलपीजी गॅस सिलेंडरसाठी इन्शूरन्स कव्हर पॉलिसी  (Insurance for LPG Cylinder) असणे आवश्यक आहे. परंतू या इन्शूरन्स कव्हरबाबत सर्व माहिती असणे आवश्यक आहे, क्लेमची प्रक्रिया काय आहे जाणून घ्या. गॅस सिलेंडर दुर्घटनेमध्ये कुटुंबातील सदस्य जखमी झाल्यास, त्यांचा मृत्यू झाल्यास किंवा घरातील मालमत्तेचे नुकसान झाल्यास कव्हर मिळतो. ऑइल मार्केटिंग कंपन्या (OMCs - Oil Marketing Companies) आणि डीलर याप्रकारची एक एलपीजी गॅस इन्शूरन्स पॉलिसी देऊ करतात जी ग्रुप इन्शूरन्स कव्हर प्रमाणे असते. (हे वाचा-सामान्य माणसांचं बजेट बिघडलं! कांदा-बटाट्यानंतर आता खाद्यतेलाच्या किंमती वाढल्या) इंडियन ऑइल कॉरपोरेशन, हिंदूस्तान पेट्रोलियम कॉरपोरेशन, भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड यांसारख्या ऑइल मार्केटिंग कंपन्यांची एक कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शूरन्स पॉलिसी आहे. या पॉलिसीमध्ये LPG संबंधित दुर्घटनांमुळे प्रभावित झालेल्या लोकांना दिलासा मिळावा याकरता कंपन्या रजिस्टर्ड असणाऱ्या सर्व ग्राहकांना पॉलिसी कव्हर देतात. पॉलिसी कव्हरेजमध्ये काय समाविष्ट आहे? तेल विपणन कंपन्या ज्या पब्लिक लायबिलिटी विमा पॉलिसी घेतात त्यांच्याकडून LPG दुर्घटनेमुळे लागलेली आग हे अपघाताचे मुख्य कारण आहे, अशावेळी अपघातामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई मिळते. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की अपघाताच्या परिस्थितीत आगीचा मुख्य कारण दुसरे असेल तर या विमा संरक्षणाचा लाभ उपलब्ध मिळणार नाही. (हे वाचा-बँकेतील पैशाच्या व्यवहाराबाबतचा हा नियम बदलणार, जाणून घ्या सर्व काही) पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने जुलै 2019 मध्ये या विमा संरक्षणाची माहिती राज्यसभेलाही दिली आहे. त्यात म्हटले आहे की मृत्यू झाल्यास प्रति व्यक्ती 6 लाख रुपयांचा अपघात विमा मिळेल. वैद्यकीय खर्चाची रक्कम 30 लाख रुपये असेल, त्यापैकी प्रति व्यक्ती जास्तीत जास्त 2 लाख रुपये मिळतील. घरगुती मालमत्तेची हानी झाल्यास ग्राहकांच्या नोंदणीकृत घरामध्ये प्रत्येक प्रकरणात जास्तीत जास्त 2 लाख रुपये कव्हर केले जातील. काय आहे क्लेमची प्रक्रिया? महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्यांच्या इन्शूरन्स पॉलिसमध्ये सर्व रजिस्टर्ड LPG ग्राहक समाविष्ट आहेत. त्यामुळे अशाप्रकारची कोणतीही दूर्घटना झाल्यास डिस्ट्रीब्युटरला त्वरित लिखित स्वरुपात माहिती देणे आवश्यक आहे. त्यानंतर डिस्ट्रीब्युटर कडून ही माहिती तेल कंपनी आणि इन्शूरन्स कंपनीला देईल. त्यानंतर तेल कंपनीकडून संबंधित घटनेबाबत दूर्घटनेचं कारण तपासून इन्शूरन्स क्लेमची औपचारिकता पूर्ण केली जाईल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: