मुंबई, 29 डिसेंबर : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) 1 जानेवारी 2022 पासून त्यांच्या बँकिंग नियमांमध्ये बदल करत आहे. याअंतर्गत पैसे जमा करण्यापासून पैसे काढण्यापर्यंतच्या नियमांमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. IPPB ग्राहकांना आता त्यांच्या खात्यात निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा करणे किंवा काढणे यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) 3 प्रकारची बचत खाती उघडण्याची सुविधा देते. बँकेने या तिन्ही खात्यांशी संबंधित पैसे काढणे आणि जमा करण्याचे नियम बदलले आहेत. चला जाणून घेऊया नव्या नियमांबद्दल… IPPB बेसिक सेविंग अकाऊंट बेसिक सेविंग अकाऊंटमध्ये कॅश डिपॉझिट फ्री ठेवलं आहे. खातेदार कितीही रक्कम जमा करू शकतात. मात्र, या खात्यातून दर महिन्याला फक्त 4 वेळा पैसे काढणे मोफत असेल. त्यानंतर, प्रत्येक रोख पैसे काढण्याच्या व्यवहारावर 0.50 टक्के शुल्क आकारले जाईल जे प्रति व्यवहार किमान 25 रुपये असेल. Penny Stock मध्ये गुंतवणूक करताना खबरदारी घ्या; पैसे बुडण्याची शक्यताही जास्त IPPB सेविंग्स आणि करंट अकाऊंट सेविंग्स (बेसिक सेविंग्स अकाऊंट व्यतिरिक्त) आणि करंट अकाऊंटमध्ये, दरमहा 10,000 रुपयांपर्यंतच्या कॅश विनामूल्य जमा केल्या जातील. 10,000 रुपयांपेक्षा जास्त ठेवींसाठी, त्या रकमेच्या 0.50% किंवा किमान 25 रुपये प्रति शुल्क आकारले जातील. ZebPay सह तुम्ही तुमचा क्रिप्टोकरन्सी प्रवास का सुरू करावा याची 5 ठोस कारणे IPPB ने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले, बँक सर्व संबंधितांना सूचित करते की रोख ठेव आणि रोख पैसे काढण्याच्या व्यवहारांवरील नवीन शुल्क 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील. या शुल्कांमध्ये व्यवहाराच्या वेळी लागू होणार्या दराने GST/सेसचा समावेश नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.