Sensex VS Gold: दोन्ही 50 हजारांपर्यंत पोहचण्यासाठी लागली 21 वर्षं, कुठे मिळेल चांगला रिटर्न

Sensex VS Gold: दोन्ही 50 हजारांपर्यंत पोहचण्यासाठी लागली 21 वर्षं, कुठे मिळेल चांगला रिटर्न

सोने (Gold) किंवा सेन्सेक्सवर (Sensex) दीर्घ मुदतीसाठी तुम्हाला सर्वात चांगला रिटर्न कुठे मिळेल? लहान कालावधीसाठी दोघांमध्ये जवळपास एक समान रिटर्न मिळत आहे. वाचा दीर्घ मुदतीसाठी कोणता पर्याय फायद्याचा ठरेल

  • Share this:

नवी दिल्ली, 28 जानेवारी: सोने (Gold) किंवा सेन्सेक्सवर (Sensex) दीर्घ मुदतीसाठी तुम्हाला सर्वात चांगला रिटर्न कुठे मिळेल? लहान कालावधीसाठी दोघांमध्ये जवळपास एक समान रिटर्न मिळत आहे. जवळपास 21 वर्षांपूर्वी सेन्सेक्स आणि सोने दोघेही समान स्तरावर होते. आजही दोघेही जवळपास समान स्तरावरच ट्रेड करत आहेत. 1999 मध्ये सोन्याचा भाव 4,234 रुपये प्रति ग्रॅम ऐवढा होता. तर त्याचवेळी बीएसई सेन्सेक्स (bse sensex) 4,141 अंकावर ट्रेड होत होते. आता जवळपास 21 वर्षांनंतर दोघेही जवळजवळ समान स्तरावरच ट्रेड करताना दिसत आहेत. सोन्याची किंमत यावेळी 12 पटीने वाढून 49,659 रुपये प्रति तोळावर पोहचली आहे. तर दुसरीकडे सेन्सेक्सही 12 पटीने वाढून 49,000च्या आसपास पोहचला आहे.

पण, या 21 वर्षात सेन्सेक्सने रिटर्नच्या बाबतीत सोन्यापेक्षा जवळपास 50 टक्के अधिक रिटर्न दिले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सेन्सेक्सचे वास्तविक रिटर्न हे प्राइस रिटर्न्स इंडेक्सवर (PRI) आधारित नाही. तर ते टोटल रिटर्न्स इंडेक्सवर (TRI) आधारित आहे. प्राइस रिटर्न्स इंडेक्सच्या माध्यमातून फक्त भांडवल वाढीची माहिती मिळते. तर  टोटल रिटर्न्स इंडेक्सच्या माध्यमातून भांडवल वाढी व्यतिरिक्त डिविडेंड, व्याज आणि भांडवली नफ्याविषयी माहिती मिळते.

(हे वाचा-घरबसल्या अशाप्रकारे करा तुमचं PAN Card व्हेरिफाय, 2 मिनिटांत होईल काम)

सेन्सेक्स 50 पट जास्त फायदेशीर कसा राहिला

गेल्या 21 वर्षांमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी 4,100 - 4,200 वरुन 50,000 रुपयांपर्यंत पोहचला आहे. सेन्सेक्सचा टीआरआय 30 जून 1999 मध्ये 4,356 रुपये होता. त्यामध्ये वाढ होऊन सध्या तो जवळपास 72,200 रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. यामध्ये जवळपास 17 पटीने वाढ झाली आहे. सेन्सेक्सचा टीआरआय 14.31 टक्के सीएजीआरनुसार वाढला आहे. आता हे सोन्याच्या तुलनेमध्ये 22,500 रुपये म्हणजेच जवळपास 45 टक्क्यांनी अधिक आहे.

वास्तविक रिटर्न जाणून घेण्यासाठी टीआरआय का महत्वाचा आहे

टीआरआय फक्त कोणत्याही स्टॉकमुळे इंडेक्समध्ये होणाऱ्या वाढीबद्दल माहिती देत नाही तर या स्टॉकवर मिळणाऱ्या डिव्हिडेंडच्या बद्दल देखील माहिती देतो. एखाद्या इंडेक्स स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना त्या इंडेक्सच्या रिटर्न्सबाबत माहिती करुन घेतली पाहिजे. तेव्हाच तुम्हाला त्या इंडेक्सच्या वास्तविक रिटर्नबाबत माहिती मिळेल.

(हे वाचा-पीएमसी बँक घोटाळा: Yes Bank चे माजी एमडी राणा कपूर यांना अटक, ED ची कारवाई)

तज्ज्ञांचे देखील हेच मत आहे की, वेगळ्या पद्धतीच्या एसेट क्लासमधील रिटर्नबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी रिटर्न्स इंडेक्सच्या माध्यमातून वास्तविक रिटर्नबद्दल अचूक माहिती गोळा केली जाऊ शकते. इक्विटी रिटर्न जाणून घेण्यासाठी हा सर्वात चांगला मार्ग मानला जातो. कारण यामध्ये भांडवलाच्या वाढीव्यतिरिक्त डिव्हिडेंड्सचा देखील समोवेश केला जातो.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 28, 2021, 11:35 AM IST

ताज्या बातम्या