मराठी बातम्या /बातम्या /मनी /घरामध्ये पडून राहिलेल्या सोन्यातून मिळवा 2.5 टक्के दराने व्याज; वाचा RBI चा नियम

घरामध्ये पडून राहिलेल्या सोन्यातून मिळवा 2.5 टक्के दराने व्याज; वाचा RBI चा नियम

बदलत्या काळात सोन्याच्या गुंतवणुकीतील जोखीम आणि त्रुटी लक्षात आल्यानं तसंच गुंतवणूकीचे अनेक नवीन पर्याय उपलब्ध झाल्यानं गुंतवणुकीसाठी लोक वेगळ्या पर्यायांचा विचार करत आहेत.

बदलत्या काळात सोन्याच्या गुंतवणुकीतील जोखीम आणि त्रुटी लक्षात आल्यानं तसंच गुंतवणूकीचे अनेक नवीन पर्याय उपलब्ध झाल्यानं गुंतवणुकीसाठी लोक वेगळ्या पर्यायांचा विचार करत आहेत.

बदलत्या काळात सोन्याच्या गुंतवणुकीतील जोखीम आणि त्रुटी लक्षात आल्यानं तसंच गुंतवणूकीचे अनेक नवीन पर्याय उपलब्ध झाल्यानं गुंतवणुकीसाठी लोक वेगळ्या पर्यायांचा विचार करत आहेत.

  नवी दिल्ली, 19 ऑगस्ट: भारत हा जगातील सोन्याची सर्वाधिक आयात (Gold Import) करणारा दुसऱ्या क्रमाकांचा देश आहे. आपल्या देशात सोन्याला भावनिक मूल्य अधिक आहे. सोन्यातून नफा मिळवण्याऐवजी अडचणीच्या प्रसंगी गरज पडल्यास त्याचा वापर करता यावा या हेतूनं त्यात गुंतवणुक केली जाते. अडचणीच्या वेळी सोनं विकणं हा सर्वात शेवटचा मार्ग असतो. मात्र सहजसोपा व्यवहार, पूर्वापार चालत आलेला मार्ग म्हणून आजही आपल्या देशात सर्वसामान्य लोकही गुंतवणुकीसाठी सोन्यालाच पसंती देतात.

  बदलत्या काळात सोन्याच्या गुंतवणुकीतील जोखीम आणि त्रुटी लक्षात आल्यानं तसंच गुंतवणूकीचे अनेक नवीन पर्याय उपलब्ध झाल्यानं गुंतवणुकीसाठी लोक वेगळ्या पर्यायांचा विचार करत आहेत. गुंतवणूक तज्ज्ञही सोन्याच्या दागिन्यांपेक्षा पेपर गोल्डला प्राधान्य देतात. लोकांचा सोन्यातील गुंतवणुकीवर असलेला विश्वास बघून गोल्ड ईटीएफसारखे अनेक पर्यायही उपलब्ध करण्यात आले आहेत. यातील आणखी एक पर्याय आहे तो म्हणजे सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond)

  हे वाचा- EPFO ने व्याजाच्या पैशासंदर्भात दिलं महत्त्वाचं अपडेट, खात्यात कधी येणार पैसे?

  घरात पडून असलेल्या सोन्यातून व्याजाची कमाई

  आजच्या काळात घरात दागिने ठेवणं हे अतिशय जोखमीचं आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी दागिने बँकेत लॉकरमध्ये ठेवावे लागतात. त्यासाठी वेगळे शुल्क भरावे लागते, तसंच हवे तेव्हा दागिने घालण्याची सोय राहत नाही. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांमध्ये पैसे गुंतवून शेवटी ते लॉकरमध्ये ठेवावे लागत असल्यानं दागिने करण्याचा कल कमी झाला आहे. तरीही आपल्या देशात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे सोने आयात करावे लागते. त्यासाठी प्रचंड प्रमाणात परकीय चलन खर्च करावे लागते. हे लक्षात घेऊन सरकारनं एक अभिनव योजना दाखल केली आहे, ती म्हणजे सॉव्हरेन गोल्ड बाँड.

  यामुळे घराघरात पडून असलेलं सोनं बाजारपेठेत येईल आणि आयात कमी होईल, अशी अपेक्षा आहे. सोन्याचे दागिने घरात किंवा लॉकरमध्ये ठेवल्यास त्यातून कोणतेही उत्पन्न मिळत नाही. उलट खर्च आणि जोखीम वाढते. तुम्ही घरात पडून असणारं सोनं BI ने नियुक्त केलेल्या बँकेत जमा करू शकता आणि त्यावर व्याज मिळवू शकता. ही सुविधा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुवर्ण मुद्रीकरण योजनेअंतर्गत (Gold Monetization Scheme) मिळते. ही बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट सारखीच योजना आहे. या योजनेद्वारे घरात पडून असलेले सोने बँकेत जमा केले जाते आणि ठराविक मुदतीनंतर ते सोने किंवा सोन्याचे मूल्य व्याजासह परत मिळते.

  हे वाचा-खात्यात झिरो बॅलन्स असेल तरीही काढता येतील पगाराच्या तिप्पट पैसे, वाचा सविस्तर

  या बँकांमध्ये ही योजना उपलब्ध

  एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) यासह अनेक बँकामध्ये ही योजना उपलब्ध आहे. ट्विटरवर या सुवर्ण मुद्रीकरण योजनेचा प्रचार केला जात आहे. एचडीएफसी बँक या योजनेत दीर्घ मुदतीसाठी 2.50 टक्के तर मध्यम मुदतीसाठी 2.25 टक्के व्याज देत आहे.

  भारतातील रहिवासी असलेली कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. संयुक्त नावानेही यात गुंतवणूक करता येते. बँका या योजनेअंतर्गत सोन्याचे बार, नाणी, रत्ने आणि इतर धातू वगळता दागिन्यांच्या स्वरूपात कच्चे सोने स्वीकारतात. गुंतवणूकदार किमान 10 ग्रॅम कच्चे सोने जमा करू शकतात. याकरता कमाल मर्यादा नाही. गुंतवणूकदार 1 ते 15 वर्षांच्या दरम्यान कोणतीही मुदत निवडता येतात. मुदतीनुसार व्याजदर ठरतात. मुदतीचे शॉर्ट टर्म बँक डिपॉझिट (STBD): कार्यकाळ 1 ते 3 वर्षे, मध्यम मुदत (MTGD 5-7 वर्षे आणि दीर्घकाळ मुदत 12-15 वर्षे असे पर्याय आहेत.

  फक्त मुदत संपल्यानंतर ठेवीदाराला ज्या स्वरूपात त्याने जमा केले होते त्याच स्वरूपात सोने मिळत नाही. तर जमा केलेले सोन्याचे दागिने किंवा वितळवून त्याची शुद्धता तपासली जात असल्यानं त्या कच्च्या स्वरूपातच सोने परत मिळते.

  First published:

  Tags: Gold, India