Home /News /money /

खात्यात झिरो बॅलन्स असेल तरीही काढता येतील पगाराच्या तिप्पट पैसे, काय आहे ही Bank Service?

खात्यात झिरो बॅलन्स असेल तरीही काढता येतील पगाराच्या तिप्पट पैसे, काय आहे ही Bank Service?

What is Salary Overdraft?

What is Salary Overdraft?

जर तुम्हाला पैशांची आवश्यकता निर्माण झाली तर कर्जाच्या पर्यायाकडे न वळता तुम्ही आणखी एक पर्याय वापरू शकता. जाणून घ्या काय आहे ही बँक सुविधा

    नवी दिल्ली, 19 ऑगस्ट: अनेकदा एखाद्या व्यक्तीला आपात्कालीन परिस्थितीमध्ये पैशांची आवश्यकता भासते. अशावेळी नातेवाईकांकडून आर्थिक मदत, गोल्ड, कर्ज अशा विविध पर्यायांचा विचार केला जातो. मात्र आणखी एक सुविधा आहे ज्याअंतर्गत देखील तुम्ही पैशांची समस्या सोडवू शकता. याकरता तुम्हाला कर्जासाठी अर्ज करण्याचीही आवश्यकता नाही. या बँकिंग सुविधेचं नाव आहे ओव्हरड्राफ्ट सुविधा (What is Overdraft Service) तुम्ही पगारधारक कर्मचारी असाल तर सॅलरी ओव्हरड्राफ्ट सुविधेचा फायदा घेऊ शकता. काय आहे सॅलरी ओव्हरड्राफ्ट सुविधा? (What is Salary Overdraft?) जर तुम्हाला दरमहा पगार मिळत असेल तर तुम्हाला सर्वात आधी बँक खात्याच्या माध्यमातून हे तपासावे लागेल की तुम्ही सॅलरी ओव्हरड्र्राफ्ट सुविधेसाठी पात्र आहात की नाही. जर बँकिंग नियमांनुसार तुम्ही ओव्हरड्राफ्ट मिळवण्यासाठी पात्र असाल तर कोणतीही समस्या येणार नाही. सॅलरी ओव्हरड्राफ्ट एक प्रकारचे क्रेडिट असते जे तुम्हाला केवळ सॅलरी अकाउंटमध्येच मिळू शकते. तुम्हाल पैशांची आवश्यकता असल्यास अगदी खात्यात झिरो बॅलन्स असेल तरी तुम्ही यातून पैसे काढू शकता. हे एक प्रकारचे Instant Loan असते. हे वाचा-Petrol Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं डिझेल, काय आहेत लेटेस्ट भाव या इंस्टंट लोनवर तुम्हाला व्याज द्यावे लागते, प्रोसेसिंग फी देखील द्यावी लागते. ICICI बँक इन्स्टा फ्लेक्सी कॅशची सुविधा देतं आणि ग्राहकांना ही सुविधा ऑनलाइन मिळवता येईल. या सुविधेअंतर्गत ग्राहकांना त्यांच्या पगाराच्या तीन पट रक्कम ओव्हरड्राफ्ट स्वरुपात घेता येईल. ग्राहक 48 तासात ओव्हरड्राफ्टचा वापर करू शकतील. कुणाला मिळेल ओव्हरड्राफ्ट सुविधा? ओव्हरड्राफ्ट सुविधा बँकेच्या सर्व ग्राहकांना मिळत नाही. बँक ग्राहक आणि कंपन्यांचं क्रेडिट प्रोफाइल पाहून ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते. तुम्हाला ओव्हरड्राफ्ट सुविधा हवी असेल तर तुम्ही कस्टमर केअरशी संपर्क करू शकता. हे वाचा-राज्यातील कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देतंय गिफ्ट, मिळणार Advance Salary! काय आहेत फायदे? सॅलरी ओव्हरड्राफ्ट सुविधा अशावेळी कामी येते जेव्हा अचानक एखादा मोठा खर्च निर्माण होतो किंवा एखादा EMI किवा SIP खात्यातून वजा होणार असतो. जर एखाद्या चेकचे पैसे खात्यातून कमी होणार असतील, पण खात्यात जर तेवढी रक्कम नसेल तर तुम्ही या सुविधेचा वापर करू शकता. जेणेकरून चेक बाउन्स होणार नाही. किती द्यावं लागेल व्याज? या योजनेसाठी तुम्हाला दरमहा 1 ते 3 टक्के व्याज द्यावं लागेल. अर्थात वार्षिक व्याज 12 ते 30 टक्क्यांपर्यंत होईल. क्रेडिट कार्डप्रमाणे या योजनेसाठीही जास्त व्याज द्यावं लागतं.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Bank, Bank details, Icici bank, Money

    पुढील बातम्या