मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold rate today : रुपया घसरला अन् सोनं महागलं; वाचा आजचे दर

Gold rate today : रुपया घसरला अन् सोनं महागलं; वाचा आजचे दर

सोनं खरेदी करताना लक्षात ठेवा या 3 गोष्टी, ज्वेलर्स कधीच करू शकणार नाहीत फसवणूक

सोनं खरेदी करताना लक्षात ठेवा या 3 गोष्टी, ज्वेलर्स कधीच करू शकणार नाहीत फसवणूक

दसऱ्यापासून सोन्याला चांगली झळाळी आली आहे. दसऱ्यापासून सोन्याचे दर चढे आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : दसऱ्यापासून सोन्याला चांगली झळाळी आली आहे. दसऱ्यापासून सोन्याचे दर चढे आहेत. आता सोन्याचे दर दिवाळीपर्यंत चढेच राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. HDFC सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, रुपयाने आज नीचांक गाठला आहे. डॉलरचं मूल्य वाढल्याने त्याचा परिणाम सोन्यावरही पाहायला मिळाला.

रुपयाच्या घसरणीमुळे शुक्रवारी सोन्याचा भाव 37 रुपयांनी वाढून 52,300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागच्या व्यवहारात भाव 52,263 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता. चांदीचा भावही 311 रुपयांनी वाढून 61,711 रुपये प्रति किलोवरून 62,022 रुपये झाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 16 पैशांनी घसरून 82.33 च्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर आला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,711.16 डॉलर प्रति औंस तर चांदीचा भाव 20.73 डॉलर प्रति औंस झाला आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे संशोधन विश्लेषक दिलीप परमार म्हणाले, "स्पॉट कॉमेक्स गोल्डचा शेवटचा व्यापार $1,711.16 प्रति औंस होता, तर भारतीय सोन्याच्या किमती कमजोर रुपया आणि मजबूत भौतिक सोन्याच्या मागणीमुळे वाढल्या."

तुमच्या ज्वेलरनं दागिन्याऐवजी डिजिटल गोल्ड ऑफर केलं तर काय करावं?

सोनं का वाढलं

क्रूड ऑइलचे दर वाढल्यामुळे रुपया घसरल्याचं सांगितलं जात आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मंदीचे संकेत मिळत आहेत. सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढू शकते. त्यामुळे सोन्याचे दर आणखी वधारण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोनं खरेदी करताना घ्या काळजी

सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे बनावट दागिनेही बाजारात मिळू लागले आहेत. अशा परिस्थितीत, आयएसओ (Indian Standard Organization) लोकांना खोटे दागिने ओळखण्यासाठी हॉलमार्क तपासण्याचा सल्ला देते. 18 कॅरेटवर 750, 21 कॅरेटवर 875, 23 कॅरेटवर 958 आणि 24 कॅरेट सोन्यावर 999 लिहिलेलं असंत.

सोन्याचे दागिने पायात का घातले जात नाहीत? काय आहे याचं कारण

तुमच्या शहरातील दर तपासा

शक्यतो सोनं खरेदी करताना होलमार्क असलेलं सोनं घ्या. तुमच्या शहरातील सोन्याची किंमत तुम्ही घरबसल्या तपासू शकता. 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन तुम्ही तुमच्या शहरातील दर तपासू शकता. काही वेळानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे नवीन दर मिळतील. याशिवाय तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com या वेबसाइटवरही नवीन दर तपासू शकता.

First published:
top videos

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold bond