जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तुमच्या ज्वेलरनं दागिन्याऐवजी डिजिटल गोल्ड ऑफर केलं तर काय करावं?

तुमच्या ज्वेलरनं दागिन्याऐवजी डिजिटल गोल्ड ऑफर केलं तर काय करावं?

तुमच्या ज्वेलरनं दागिन्याऐवजी डिजिटल गोल्ड ऑफर केलं तर काय करावं?

तुम्ही जर सोनाराकडे म्हणजेच तुमच्या ज्वेलरकडे सोनं खरेदीसाठी गेलात आणि त्याने तुम्हाला सोनं देण्यास नकार दिला तर?

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई : सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. दसरा-दिवाळी म्हटलं, की आपल्याकडे नवीन वस्तूंची खरेदी होते. विशेषत: दिवाळीच्यावेळी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. या वर्षीही नागरिकांचा सोनेखरेदीकडे कल असेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशातच तुम्ही जर सोनाराकडे म्हणजेच तुमच्या ज्वेलरकडे सोनं खरेदीसाठी गेलात आणि त्याने तुम्हाला सोनं देण्यास नकार दिला तर? दागिन्यांऐवजी तुमच्या सोनाराने तुम्हाला डिजिटल सोनं खरेदी करण्यासाठी अॅपची लिंक दिली तर? यात आश्चर्य वाटून घेण्याची काहीही गरज नाही. कारण, या वर्षी दिवाळीच्या काळात सर्रासपणे असं चित्र दिसू शकतं. नेमका हा प्रकार काय आहे, याबाबत आपण अधिक माहिती घेऊया. आतापर्यंत, एमएमटीसी-पँप (MMTC-Pamp), ऑगमाँट (Augmont) आणि सेफ गोल्ड (SafeGold) यासारख्या सरकारी-मान्यताप्राप्त गोल्ड रिफायनर्सनी, आर्थिक सेवा प्रदाते आणि ज्वेलरी ब्रँड्सशी टाय-अप करून डिजिटल सोनं ऑफर केलं आहे. सध्या काही ज्वेलर्सनी स्वत: च्या डिजिटल गोल्डसारख्या योजना सुरू केल्या आहेत, ज्यात ग्राहकाने खरेदी केलेलं डिजिटल सोनं थर्ड पार्टी म्हणजे त्रयस्थाच्या व्हॉल्टमध्ये ठेवण्यात आलं आहे असं ज्वेलर्सकडून सांगितलं जातं. त्यामुळे ते खरंच त्रयस्थाने सोनं ठेवलंय का याबाबत खात्री करता येत नाही ते तसं ठेवलं गेलेलं नसूही शकतं. “सध्या थर्ड पार्टी टाय-अपद्वारे डिजिटल सोनं ऑफर केलं जात आहे. परंतु आमच्याकडे चांगली नेटवर्थ असल्यानं, आम्ही स्वतःचं डिजिटल सोनं ऑफर करत आहोत. त्यामध्ये पेपर गोल्ड आणि चांदीचा समावेश आहे. त्यात खरेदीदाराला पोस्टानं छापील प्रमाणपत्र मिळतं,” असं बेंगळुरूमधील सी. कृष्णिया चेट्टी ग्रुप ऑफ ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सी. विनोद हयग्रीव यांनी सांगितलं. एका अॅप बिल्डरनं सी. कृष्णिया चेट्टी ग्रुप आणि पूर्व भारत व महाराष्ट्रातील इतर 70 ज्वेलर्सना डिजिटल गोल्ड ऑफर करण्यासाठी मदत केली आहे. “कोल्हापूर, अकोला आणि इतर काही भागांतील ज्वेलर्स सोन्याचा हा प्रकार ग्राहकांना ऑफर करण्यास उत्सुक होते. हे ज्वेलर्स अनेक दशकांपासून एकत्रितपणे सोन्याचा व्यवहार करत आहेत,” असं InstaLaxmi.com चे संस्थापक संजू खुशलानी म्हणाले. InstaLaxmi.com ज्वेलर्सना डिजिटल गोल्ड ऑफर करण्यासाठी यंत्रणा तयार करण्यास मदत करतं. हेतू ओडिशा येथे जामी भीमराजू आणि ब्रदर्स, हे दुकान चालवणारे ज्वेलर जामी आशिष यांनी मनीकंट्रोलला सांगितलं की, ज्यांच्याकडे एखादा नेकलेस खरेदीसाठी तत्काळ पुरेसे पैसे नसतील अशा किरकोळ सोने खरेदीदारांसाठी ते एक डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करण्याचा विचार करत आहेत. यामुळे त्यांना जास्त प्रमाणात सोनं जमा करण्यास मदत होईल. “जेव्हा त्यांच्याकडे अतिरिक्त रक्कम असेल तेव्हा ते 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 4 ग्रॅम सोनं जमा करून त्यांचं सोनं खरेदीचं स्वप्नं पूर्ण करू शकतात,” असं आशिष यांनी मुंबईतील ‘गोल्ड बिझनेस मीट’दरम्यान सांगितलं. मात्र, ज्वेलर्सच्या नेतृत्वाखालील डिजिटल सोन्याच्या ऑफरिंगबाबत एक चिंतेची बाब आहे. खरेदी केलेलं सोनं खरोखर खरेदी केलं गेलं आहे की नाही आणि ते तिजोरीत साठवलं गेलं आहे की नाही, याची शाहनिशा करता येत नाही. भारत सरकारनं आयातीला आळा घालण्यासाठी आणि परकीय चलनाच्या साठ्याचं संरक्षण करण्यासाठी सोन्यावरील आयात शुल्क 15 टक्क्यांपर्यंत वाढवलं आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    भारताने 2021 मध्ये 55.7 अब्ज डॉलर किमतीचं एक हजार 50 टन सोनं आयात केलं होतं. जे 2020 मध्ये आयात केलेल्या 430 टन सोन्याच्या दुप्पट आहे. या आकडेवारीनं 2011 मध्ये निश्चित केलेल्या 53.9 अब्ज डॉलरच्या विक्रमाला मागं टाकलं आहे. गोल्ड रिफायनर्सचा दावा आहे की, सोनं परदेशातील व्हॉल्टमध्ये साठवलं जातं. त्यामुळे आयात शुल्कात बचत होते. सोन्याच्या किमतीत वाढ होते आणि ऑनलाइन खरेदी व विक्री सुलभ होते. असं असलं तरी, जेव्हा ज्वेलर्सकडून खरेदी केलेलं डिजिटल सोनं दागिन्यांच्या खरेदीत रूपांतरित केलं जातं, तेव्हा ते प्रचलित खर्च आणि सोन्याच्या दरांच्या अधीन असेल. याबाबत चेट्टी ग्रुप ऑफ ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सी. विनोद हयग्रीव म्हणाले, “या व्यवहारामध्ये दोनदा तीन टक्के जीएसटी आकारला जातो. डिजिटल सोनं ग्राहकाला विकताना आणि अंतिम मूल्यावर ज्वेलर्स ग्राहकांना तयार दागिने विकतात, अशा दोन्ही वेळी जीएसटी आकारला जातो.” “डिजिटल सोन्याचं दागिन्यांमध्ये रूपांतर करणं हे आपलं प्रॉडक्ट ऑफर करण्यासाठी ज्वेलर्सच्या आवडीचं क्षेत्र आहे,” असंही ते म्हणाले. हयग्रीव यांनी सांगितल्यानुसार, डिजिटल सोनं हे मूलत: खरेदी प्रॉडक्ट आहे. पण, रोख रक्कम देऊन लगेच सोनं खरेदी करता येत नाही. त्यामुळे याचा विचार म्युच्युअल फंडाच्या पद्धतशीर गुंतवणूक योजनेप्रमाणे केला पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्ही दरमहा ठराविक प्रमाणात डिजिटली सोनं खरेदी करता. त्यानंतर दर महिन्याला तुमच्यासाठी सोन्याची रक्कम बाजूला ठेवली जाते.

    Gold Jewellery Insurance: चिंताच मिटली! आता स्वत:च्या घरातच सुरक्षित ठेवा दागिने, बँक लॉकरची नाही गरज

    12व्या महिन्याच्या शेवटी, तुमच्या जमा झालेल्या पैशांचा वापर करून तुम्हाला नियमित सोनं किंवा सोन्याचे दागिने खरेदी करता येतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झाल्यास सोन्यासाठी केलेल्या या एसआयपीमुळे (SIP) तुम्हाला मुदतीच्या शेवटी सोन्याचे दागिने खरेदी करता येतात. दुसरीकडे, गोल्ड ईटीएफमध्ये म्युच्युअल फंड किंवा स्टॉकप्रमाणेच रिडीम्पशनवर पैसे मिळतात. “गोल्ड ईटीएफ रिडीम्प्शननंतर प्रत्यक्ष, मूर्त सोनं देत नाहीत. शिवाय, डिजिटल किंवा पेपर गोल्डचं दागिन्यांमध्ये रूपांतर करण्यासाठी थर्ड पार्टीकडे जावं लागतं,” असं मुंबईतील झवेरी बाजारातील आरबीसी ज्वेलर्सच्या विनिता गुप्ता यांनी सांगितलं. दागिने खरेदी करणं हे अंतिम उद्दिष्ट असल्यास, तुम्ही एकतर फंड जमा करा किंवा सोनं जमा करण्याच्या योजना निवडा. या दोन्ही गोष्टी जास्त फायद्याच्या ठरतील. ज्वेलर्सद्वारे ऑफर केलेल्या सोनं संचय योजना किंवा सोनं बचत योजनांअंतर्गत, सर्व खासगी मर्यादित कंपन्यांवर काही मर्यादा आहेत. कंपनीच्या घोषित निव्वळ संपत्तीच्या केवळ 25 टक्क्यांपर्यंत सोनं बचत योजना किंवा संचय योजनेद्वारे ऑफर केली जाऊ शकते. ही योजना 11 महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी नसावी, अशीही मर्यादा आहे. कोणतेही नियम नाहीत सॉव्हेरियन गोल्ड बाँड्स किंवा गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) हा पेपर गोल्ड जमा करण्याचा आणखी एक मार्ग आहे. “वैकल्पिकदृष्ट्या, डिजिटल सोनं ग्राहकांसाठी जास्त अनुकूल पर्याय दिसतो. कारण त्यात साठवणूक किंवा शुद्धतेची कोणतीही अडचण नसते. मात्र, डिजिटल सोन्याच्या ऑफरिंगमध्ये कोणतेही नियम नाहीत त्यामुळे सोन्याच्या किरकोळ गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे,” असं MyMoneyMantra या वित्तीय सल्लागार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राज खोसला यांनी सांगितलं. भारतातील सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्डानं ऑगस्ट 2021मध्ये स्टॉक ब्रोकर्सना डिजिटल सोन्याचं वितरण करण्यापासून रोखलं आहे. पण, या सोन्याची खरेदी सध्या कोणत्याही नियमांतर्गत येत नाही. नियमांच्या सुधारणेबाबत विचार केल्यास डिजिटल सोनं हे क्रिप्टोकरन्सीसारखं आहे. त्यामुळे पश्चाताप करत बसण्यापेक्षा अगोदरच सुरक्षितता बाळगणं केव्हाही चांगलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात