नीलम कराळे, प्रतिनिधी पुणे, 15 फेब्रुवारी : भारतात सोने चांदी खरेदीसाठीचे प्रचंड आकर्षण बघायला मिळते. सोने चांदीकडे लोक उत्तम गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. त्यामुळे सोने चांदीची मागणी वाढली आहे. बाजारपेठेनुसार सोने चांदी भाव बदलत असतात. पुणे बाजारपेठेत काल 24 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार 718 रुपये प्रती तोळा होता. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 58 हजार 551 प्रती तोळा आहे. साधारण एका तोळ्या मागे 167 रुपये दर कमी झाले आहेत. तर चांदीचा दर काल प्रती किलो 72 हजार 700 रुपये होता. आजचा दर 72 हजार 500 रुपये प्रती किलो इतका आहे. चांदीचे दरही 200 रुपयांनी कमी झाले आहेत. सोन्याची मागणी आणि पुरवठा, महागाई आणि रुपया-डॉलर मूल्यांकन यासारख्या विविध कारणांमुळे पुण्यातील सोन्याचे दर दररोज कमी जास्त होत असतात. सध्या बजेटमध्ये सोन्याच्या एक्सपोर्ट ड्यूटी कमी केले तरीही नजीकच्या काळामध्ये सोन्याचे भाव वाढण्याचे किंवा कमी होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना फायदा होणार नाही. बजेटमध्ये एक्सपोर्ट ड्युटी कमी केली असली तरीही सोन्याची खरीदारी मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुरू असते. त्यासोबतच विविध कारणामुळे देखील सोने सर्व सामान्य नागरिकांना कमी दरात मिळू शकत नाही. व्याजदर वाढूनही महागाईवर नियंत्रण नाहीच, पुन्हा RBI घेणार का मोठा निर्णय? पुण्यातील आजचे सोन्याचे दर (10 ग्रॅम) 10 ग्रॅम 24 कॅरेट - 58551 10 ग्रॅम 22 कॅरेट- 53670 10 ग्रॅम 18 कॅरेट- 41220 पुण्यातील आजचे सोन्याचे दर (1 ग्रॅम) 1 ग्रॅम 24 कॅरेट - 5855 1 ग्रॅम 22 कॅरेट- 5367 1 ग्रॅम 18 कॅरेट- 4122 चांदी 72 हजार 500 रुपये किलो
(टीप : सोन्याच्या पेढ्यांमधील मजुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या सारख्या वेगवेगळ्या कारणांनुसार सोन्याची किंमत प्रत्येक दुकानामध्ये वेगळी असू शकते. आम्ही शहरातील सर्वसाधरण भाव देत आहोत.)