मुंबई : लग्न सराईचे दिवस आहेत, त्यामुळे सोनं खरेदीची लगबग सुरू आहे. सराफ बाजारात सोनं खरेदीसाठी रोज गर्दी होत आहे. ज्याची भीती होती अखेर तेच घडत आहे. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. आज सोन्याचे दर 54 हजारापर्यंत पोहोचले आहेत.
आज बाजारपेठ उघडताच सोन्याचे दर जवळपास 54 हजारवर पोहोचले आहेत. तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सोनं खरेदी करण्याआधी आजचे 24, 22, 18, 16 आणि 14 कॅरेटचे दर वाचा सविस्तर.
bullions ने वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आज सोन्याचे दर 250 रुपयांनी वधारले आहेत. 10 ग्रॅम सोन्यासाठी नागरिकांना 54,080 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचे दर 67,020 प्रति किलोवर पोहोचले आहेत.
चांदीचे दागिने आणि कॉइनवरही हॉलमार्किंग आवश्यक? काय आहे नियम
goodreturns ने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 24 कॅरेट सोन्यासाठी 53,950 पैसे मोजावे लागणार आहेत. 22 कॅरेट सोनं जवळपास आता 49, 450 रुपये झालं आहे. 1 नोव्हेंबर रोजी हाच सोन्याचा दर जवळपास 50 ते 51 हजार रुपये होता. आता जवळपास 3900 रुपयांनी वाढ झाली आहे.
bullions नुसार 24 ते 14 कॅरेट सोन्याचे दर
सोन्याचे दर | १ ग्रॅम | १० ग्रॅम |
24 कॅरेट | 5,408 | 54,080 |
22 कॅरेट | 4,957 | 49,573 |
20 कॅरेट | 4,507 | 45,067 |
18 कॅरेट | 4,056 | 40,560 |
16 कॅरेट | 3,605 | 36,053 |
14 कॅरेट | 3,155 | 31,547 |
goodreturns नुसार 24 ते 14 कॅरेट सोन्याचे दर
सोन्याचे दर | २२ कॅरेट | २४ कॅरेट दर |
१ ग्रॅम | 4,945 | 5,395 |
८ ग्रॅम | 39,560 | 43,160 |
१० ग्रॅम | 49,450 | 53,950 |
१०० ग्रॅम | 4,94,500 | 5,39,500 |
तुमच्याकडेही Hallmark नसलेले सोन्याचे दागिने आहेत का? आता काय करायचं?
सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे बनावट दागिनेही बाजारात मिळू लागले आहेत. अशा परिस्थितीत, आयएसओ (Indian Standard Organization) लोकांना खोटे दागिने ओळखण्यासाठी हॉलमार्क तपासण्याचा सल्ला देते. 18 कॅरेटवर 750, 21 कॅरेटवर 875, 23 कॅरेटवर 958 आणि 24 कॅरेट सोन्यावर 999 लिहिलेलं असंत.
शक्यतो सोनं खरेदी करताना होलमार्क असलेलं सोनं घ्या. तुमच्या शहरातील सोन्याची किंमत तुम्ही घरबसल्या तपासू शकता. 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन तुम्ही तुमच्या शहरातील दर तपासू शकता. काही वेळानंतर तुम्हाला एसएमएसद्वारे नवीन दर मिळतील. याशिवाय तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com या वेबसाइटवरही नवीन दर तपासू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price