नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : चीनमधून येणाऱ्या खराब इलेक्ट्रॉनिक सामानाच्या (Electronic Items) आयातीवर आता रोख लागणार आहे. खराब इलेक्ट्रॉनिक सामानाच्या आयातीवर रोख लावण्यासाठी भारताने 7 प्रोडक्ट कंपलसरी रजिस्ट्रेशन ऑर्डरमध्ये (Cumpolsary Registration Order)टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
हा आदेश लागू झाल्यानंतर चीनमधून येणारे खराब क्वालिटीचे डिजिटल कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा, वेबकॅम, ब्लूटूथ स्पीकर, स्मार्ट स्पीकर, वायरलेस हेडसेटच्या आयातीवर बंदी घातली जाईल. आता केवळ ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS - Bureau Standards of India) नुसार प्रमाणित झाल्यानंतरच वस्तू आयात केल्या जाऊ शकतात.
#AwaazMarkets। चीन से आ रहे हैं घटिया इलेक्ट्रॉनिक सामान के आयात पर रोक लगाने के लिए भारत ने 7 नए प्रोडक्ट को कंपलसरी रजिस्ट्रेशन ऑर्डर में डालने का फैसला किया है। पूरी खबर जानिए @aseemmanchanda से | pic.twitter.com/yykOiEQs9H
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) November 20, 2020
आता विना प्रमाण कोणत्याही वस्तू आयात करणं शक्य होणार नाही. सरकारने WTO ला या सर्व वस्तूंची लिस्ट पाठवली आहे. या कंपन्यांना BIS प्रमाण घेण्यासाठी 3 महिन्यांचा वेळ मिळेल. या लिस्टमध्ये डिजिटल कॅमेरा, व्हिडिओ कॅमेरा, वेबकॅम, ब्लूटूथ स्पीकर, स्मार्ट स्पीकर, एलईडी डिमर वायरलेस हेडसेट सामिल आहे.
सरकारने 2012 मध्ये कंपलसरी रजिस्ट्रेशन ऑर्डरचे आदेश दिले होते. या आदेशांनुसार, सरकार केवळ प्रमाणित उत्पादनांच्या आयातीस परवानगी देणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China