10 हजारांच्या गुंतवणुकीतून मिळणार 16 लाखांचा फायदा, काय आहे ही स्किम जाणून घ्या

10 हजारांच्या गुंतवणुकीतून मिळणार 16 लाखांचा फायदा, काय आहे ही स्किम जाणून घ्या

या स्किमद्वारे कमी पैशांत गुंतवणूकीची सुरुवात करू शकता. यात तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील. यात 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. अधिक गुंतवणूकीसाठी कोणतीही मर्यादा नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : पोस्ट ऑफिस (Post Office) स्किम्समध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे असतात. याची विशेष बाब म्हणजे या स्किम सुरक्षित असतात आणि इतर गुंतवणूकीच्या पर्यायांच्या तुलनेत चांगले रिटर्न्सही मिळतात. जरा कोणत्याही जोखमीशिवाय चांगले रिटर्न्स मिळवायचे असल्यास, पोस्ट ऑफिस चांगला पर्याय ठरू शकतो. अशीच चांगले रिटर्न्स देणारी पोस्ट ऑफिसची, पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉजिट (Post Office Recurring Deposit) नावाची स्किम आहे, ज्यात चांगले रिटर्न्स मिळवता येऊ शकतात.

काय आहे पोस्ट ऑफिसची ही RD स्किम -

या स्किमद्वारे कमी पैशांत गुंतवणूकीची सुरुवात करू शकता. यात तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतील. यात 100 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. अधिक गुंतवणूकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. पोस्ट ऑफिस RD डिपॉजिट अकाउंट चांगल्या व्याज दरासह, लहान हप्त्यांमध्ये जमा करण्याची एक सरकारी गॅरंटी योजना आहे.

किती मिळेल व्याज -

पोस्ट ऑफिसमध्ये ओपन होणारं RD अकाउंट 5 वर्षांसाठी असतं. यापेक्षा कमी वर्षांसाठी ओपन करता येत नाही. दर महिन्याच्या जमा रकमेवर व्याजाचं कॅलक्युलेशन केलं जातं. त्यानंतर दर तिमाहीच्या शेवटी अकाउंटमध्ये चक्रवाढ व्याजासह (compound interest) जोडलं ते जातं. इंडिया पोस्ट ऑफिच्या वेबसाईटनुसार, RD स्किमवर सध्या 5.8 टक्के व्याज देण्यात येतं. नवीन दर 1 जुलै 2020 पासून लागू करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने आपल्या सर्व छोट्या सेव्हिंग स्किममध्ये दर तिमाहीत व्याज दर जाहीर केले आहेत.

10 हजाराच्या गुंतवणूकीवर मिळतील 16 लाखांहून अधिक -

प्रत्येक महिन्याला पोस्ट ऑफिसच्या RD स्किममध्ये 10 हजार रुपये, 10 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास, त्याच्या मॅच्युरिटीवर 16.28 लाख रुपये मिळतील.

RD अकाउंटबाबत -

दर महिन्याला वेळेत RD चा हप्ता भरला नसल्यास, दंड भरावा लागेल. हप्ता भरण्यास वेळ झाल्यास, दर महिन्याला एक टक्का दंड द्यावा लागेल. त्याशिवाय सलग 4 हप्ते जमा केले नाही, तर अकाउंट बंद होईल. अकाउंट बंद झाल्यानंतर, ते पुन्हा 2 महिन्यानंतर ऍक्टिव्हेट करता येऊ शकतं.

Published by: Karishma Bhurke
First published: November 23, 2020, 9:14 AM IST

ताज्या बातम्या