• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Gold Price Today: सोन्याचे दर 48 हजारांपेक्षाही कमी! इथे तपासा प्रति तोळाचा भाव

Gold Price Today: सोन्याचे दर 48 हजारांपेक्षाही कमी! इथे तपासा प्रति तोळाचा भाव

Gold-Silver Price Today 24 Nov: जर या लग्नाच्या सीझनमध्ये सोनं-चांदी खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आता चांगली संधी आहे. जाणून घ्या काय आहे आजचा सोन्याचा भाव

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर: या लग्नसराईत तुम्हाला सोने-चांदी खरेदी (Gold Rate Today) करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. कमजोर जागतिक संकेतांमुळे सोन्याच्या किमतीत घसरण (Gold Price Down) सुरूच आहे. मात्र, आज सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ (Gold Silver Rate Hike) झाली आहे. आज, बुधवारी मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर सोन्याचा भाव 0.38 टक्क्यांनी वाढून 47,616 रुपये प्रति तोळा आहे. गेल्या मंगळवारच्या 49,340 रुपयांच्या किमतीपेक्षा ही किंमत जवळपास 2,000 रुपये कमी आहे, ही दिलासादायक बाब आहे. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही (Silver Rates Today) किंचित वाढ झाली आहे. चांदीचा भाव 0.43 टक्क्यांनी वाढून 62,777 रुपये प्रति किलो झाला आहे. हे वाचा-काय आहे पेट्रोल-डिझेलचा लेटेस्ट दर? काही दिवसात भाव उतरण्याची शक्यता मिस्ड कॉल देऊन जाणून घ्याल सोन्याचा भाव सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता. हे वाचा-स्वस्तात मिळत आहेत झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील शेअर्स, बंपर रिटर्नची अपेक्ष अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: