नवी दिल्ली, 28 मे: सोन्याचांदीच्या दरात (Gold-Prices Today) आज मोठी घसरण झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. सराफा बाजारात प्रति तोळा सोन्याची किंमत 354 रुपयांनी कमी झाली आहे. सोन्याच्या तुलनेत आज चांदीचे दर (Silver Prices Today) किरकोळ प्रमाणात उतरले आहेत. एमसीएक्सवर (MCX Multi Commodity Exchange) शुक्रवारी सोन्याचे दर 0.29 टक्क्यांनी घसरले आहेत. या घसरणीनंतर सोन्याचे दर प्रति तोळा 48,440 रुपये झाले आहेत. जुलैच्या चांदीची वायदे किंमत 71,395 रुपये प्रति किलो झाली आहे.
एमसीएक्सवर गुरुवारी सोन्याचे दर 0.02% ने वधारले होते. या वाढीनंतर सोन्याचे दर 48,794 रुपये प्रति तोळा झाले आहेत. गुरुवारी चांदीचे दर 71,400 रुपये प्रति किलो होते.
हे वाचा-Post Office मध्येही सुरक्षा विमा; 50 लाखांपर्यंत कव्हरेज आणि कर्जाची सुविधा
BIS हॉलमार्किंग अनिवार्य करण्याची तारीख वाढवली
केंद्र सरकारने असा निर्णय घेतला होता की, पुढील महिन्याच्या पहिल्या दिवसापासून अर्थात 1 जूनपासून देशात केवळ बीआयएस हॉलमार्किंग (BIS hallmarking) असणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांची विक्री होईल. मात्र देशातील कोरोनाची परिस्थिती (Coronavirus in India) लक्षात घेता सरकारने हॉलमार्किंग अनिवार्यता लागू करण्याची तारीख 15 दिवसांनी वाढवली आहे. अर्थात आता 15 जूनपासून ही प्रक्रिया अनिवार्य केली जात आहे. त्यानंतर देशात केवळ हॉलमार्किंग असणारीच ज्वेलरी विकली जाईल. सोन्याच्या शुद्धतेबाबत होणारी फसवणूक कमी करण्यासाठी हा निर्णय फायद्याचा ठरेल, असं जाणकारांचं मत आहे.
हॉलमार्किंग (Hallmarking) अनिवार्य झाल्यानंतर 15 जूननंतर देशभरातील दागिन्यांच्या बाजारपेठेत केवळ हॉलमार्क असलेले 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने विकले जातील.
हे वाचा-LPG गॅस बुकिंगबाबतचे नियम बदलणार, सिलेंडर रिफिल करणं होईल अधिक सोपं
स्वस्त सोन्यात गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस
सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond 2021) ही योजना पुन्हा एकदा पाच दिवसासाठी 24 मे ते 28 मे दरम्यान खुली करण्यात आली आहे. त्यामुळे याअंतर्गत सोनेखरेदी करण्याचा आज या टप्प्यातील शेवटचा दिवस आहे. या आर्थिक वर्षातील SGB चा पहिला टप्पा 17 मे ते 21 मे रोजी जारी करण्यात आला होता.
सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond) च्या दुसऱ्या टप्प्यात 4,842 रुपये प्रति ग्रॅम या दराने सोनेखरेदी करता येणार आहे. पहिल्या टप्प्यादरम्यान हे मुल्य 4,777 रुपये प्रति ग्रॅम होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price