मुंबई, 25 फेब्रुवारी : DBS Bank India Limited (DBIL) मध्ये विलीन झाल्यानंतर पूर्वी लक्ष्मी विलास बँक (Laxmi Vilas Bank) म्हणून ओळखल्या जाणार्या बँकेच्या सर्व शाखांचा IFSC आणि MICR कोड बदलला आहे. हा नवा कोड 25 ऑक्टोबर 2021 पासून सक्रिय असला तरी ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन 28 फेब्रुवारी 2022 पासून सर्व जुने IFSC कोड बदलले जातील. 1 मार्च 2020 पासून NEFT/RTGS/IMPS द्वारे फंड ट्रान्सफरसाठी ग्राहकांना नवीन DBS IFSC कोड आवश्यक असेल. या बदलांची माहिती ग्राहकांना पत्र, एसएमएस (SMS) आणि ई-मेलद्वारे (E-mail) देण्यात आली आहे, अशी माहिती डीबीएसने यासंदर्भात जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. बँकेच्या शाखांमध्येही ही माहिती देण्यात आली आहे. Cryptocurrency Update : क्रिप्टोकरन्सीमध्ये कालच्या पडझडीनंतर तेजी, वाचा सध्याचे दर बँकेच्या अधिकृत निवेदनात पुढे म्हटले आहे की थर्ड पार्टी जारी केलेले सध्याचे सर्व चेक 28 फेब्रुवारी 2022 पूर्वी नवीन चेकद्वारे बदलले पाहिजेत. 28 फेब्रुवारीनंतर जुना MICR कोड असलेला कोणताही चेक स्वीकारला जाणार नाही. नवीन MICR कोडसह नवीन चेकबुक फक्त 1 नोव्हेंबर 2021 पासून उपलब्ध आहे. Bank Lockers New Rule: नुकसान झाल्यास ग्राहकांना मिळणार मोठी भरपाई, RBI ने जारी केले नियम लक्ष्मी विलास बँकेचे डीबीएस बँक इंडिया लिमिटेडमध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे. डीबीएस बँक इंडिया ही डीबीएस ग्रुप होल्डिंगची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. हे विलीनीकरण 27 नोव्हेंबर 2020 पासून लागू आहे. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला DBS बँक इंडियाने आघाडीच्या डेअरी-टेक स्टार्टअप स्टेलापसोबत (Stellapps) बँकिंग भागीदारी कराराची घोषणा केली होती, ज्याअंतर्गत भारतातील छोट्या डेअरी कंपन्यांमध्ये डिजिटायझेशनला प्रोत्साहन दिले जाईल. सध्या थेट 20,000 शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि नजीकच्या भविष्यात या योजनेचा लाभ 1 लाख दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.