कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकलेल्या संपूर्ण जगासाठी ऑस्ट्रेलियामधून (Australia) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सीएसएल लिमिटेड कंपनीने, ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेकाच्या (AstraZeneca and the University of Oxford) कोरोना व्हायरस वॅक्सिनचं (Corona Vaccine) उत्पादन सुरू केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारपर्यंत कंपनी वॅक्सिनच्या तीन कोटी डोसच्या उत्पादनापर्यंत पोहचली असल्याचा दावा ऑस्ट्रेलियायी मिडियाने केला आहे. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)
सिडनीतील 2-जीबी रेडिओनुसार, ऑस्ट्रेलियाचे आरोग्य मंत्री ग्रेग हुंट (Greg Hunt) यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. हुंट यांनी, सांगितलं की, ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रॅजेनेका वॅक्सिन घेणं ऐच्छिक असेल, परंतु आम्ही अधिकाधिक लोकांना यासाठी प्रोत्साहित करू. ऑस्ट्रेलियन लोकसंख्येनुसार आमच्याकडे अधिक वॅक्सिन असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये सर्वसामान्यांना वॅक्सिन देण्यास सुरुवात केली जाईल. (फोटो सौ. न्यूज18 इंग्लिश)