Home /News /money /

Gold Price: सोन्याच्या किंमतीत मागील 7 वर्षातील सर्वात मोठी घसरण; हे आहे कारण

Gold Price: सोन्याच्या किंमतीत मागील 7 वर्षातील सर्वात मोठी घसरण; हे आहे कारण

या संकेतांचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येणार आहे. भारतीय बाजारात सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात. सध्याच्या परिस्थितीनुसार, किंमती 5 ते 8 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 10 नोव्हेंबर : कोरोना वॅक्सिनबाबत (Coronavirus Vaccine) आलेल्या बातमीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. न्यूज एजेन्सी रॉयटर्सने (Reuters) दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर 5 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. टक्केवारीच्या बाबतीत विचार केल्यास, 2013 नंतर एका दिवसातली ही सर्वात मोठी घसरण असल्याचं, जाणकारांचं म्हणणं आहे. या संकेतांचा परिणाम देशांतर्गत बाजारावरही दिसून येणार आहे. भारतीय बाजारात सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात. सध्याच्या परिस्थितीनुसार, किंमती 5 ते 8 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. भारतीय रुपया सतत मजबूत होणं, हे यामागील महत्त्वाचं कारण आहे. सोमवारी सोन्याचे दर वाढून 52,183 रुपयांवर पोहचले होते. वॅक्सिनच्या बातम्यांमुळे मोठी घसरण - अमेरिकी फार्मा कंपनी फायजर आणि त्यांची जर्मनीची पार्टनर कंपनी BioNTech SE ने कोरोना व्हायरस वॅक्सिनच्या तीसऱ्या टप्प्यातील ट्रायल 90 टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. या दोन्ही कोरोना काळातील अशा कंपन्या आहेत, ज्यांनी वॅक्सिनच्या यशस्वी परिणामांचा आकडा सादर केला आहे. OANDA चे सीनियर मार्केट एनालिस्ट एडवर्ड यांनी सांगितलं की, कोरोना वॅक्सिनची बातमी अतिशय मोठी आहे. याचा जगभरातील मार्केटवर परिणाम पाहायला मिळतो आहे. अशात आता सेफ-सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची केली जाणारी खरेदी थांबू शकते. त्यामुळे येत्या काही दिवसात आणखी घसरण पाहायला मिळू शकते. असं असलं तरी अद्यापही आर्थिक स्थिती फारशी उत्तम नसल्याचंही ते म्हणाले. (वाचा - 1 कोटीहून अधिक पेन्शनर्ससाठी खुशखबर; आता घरबसल्या बनवा लाईफ सर्टिफिकेट) जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याला अनेकदा कठीण काळातच झळाळी येते. 1970 च्या दशकात आलेल्या मंदीमध्ये सोन्याच्या किंमतींनी नवी उंची गाठली होती. त्यानंतर 2008 च्या आर्थिक मंदीदरम्यानही अशाच प्रकारची परिस्थिती होती. आकड्यांनुसार, 80 च्या दशकात सोनं सात पटींनी वाढून 850 डॉलर प्रति औंसच्या रेकॉर्ड स्तरावर पोहचलं होतं. 2008 मध्येही जागतिक आर्थिक संकटात सोन्यात पुन्हा तेजी आली, जे 2011 मध्ये 1900 डॉलरवर गेलं होतं. परंतु काही दिवसांत पुन्हा किंमती कमी झाल्या. त्यामुळे आता कोरोना वॅक्सिन आल्यास आणि वॅक्सिन पूर्णपणे यशस्वी ठरल्यास, सोन्याच्या किंमतीत मोठ्या घसरणीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतात काय असेल परिस्थिती - जसजशी कोरोना वॅक्सिनबाबत माहिती मिळेल, त्यासंबंधीत बातम्या येतील, तसं सोन्याच्या किंमतींवरील दबाव वाढेल. सध्याच्या परिस्थितीत सोन्याच्या किंमतीत 5 ते 8 टक्क्यांची घसरण पाहायला मिळू शकते, असा अंदाज जाणकारांकडून वर्तवण्यात आला आहे.
    Published by:Karishma Bhurke
    First published:

    Tags: Gold, Gold and silver prices today

    पुढील बातम्या