जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण, एक तोळे सोनं खरेदी केल्यास किती स्वस्त मिळेल?

Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण, एक तोळे सोनं खरेदी केल्यास किती स्वस्त मिळेल?

Gold Price Today: सोन्याच्या दरात घसरण, एक तोळे सोनं खरेदी केल्यास किती स्वस्त मिळेल?

Gold Price Today: सोने आजही त्यांच्या उंच्चाकी पातळीपेक्षा 5,475 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 जून : जागतिक बाजारपेठेत वाढ होऊनही आज भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण (Gold Silver Price Drop Today) झाली आहे. लग्नसराईचा हंगाम असूनही सोन्याची मागणी कमी होत असल्याने भाव 50 हजारांच्या जवळ आले आहेत. मंगळवारी सकाळी चांदीचीही 60 हजारांच्या आसपास विक्री झाली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर (Gold Price Today) 50,725 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर कालच्या व्यवहाराच्या दिवशी तो 51,435 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला. अशा प्रकारे आज सोन्याचा दर 710 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या घसरणीसह उघडला आहे. मात्र असं असूनही सोने आजही त्यांच्या उंच्चाकी पातळीपेक्षा 5,475 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त विकले जात आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. शेअर बाजारातील पडझडीतही राकेश झुनझुनवालांची मोठी कमाई, एकाच शेअरमधून कमावले 215 कोटी आज चांदीचा दर (Silver Price Today) 60164 रुपये प्रति किलोवर खुला झाला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा भाव 60912 प्रति किलोच्या दराने बंद झाला होता. अशा प्रकारे आज चांदीचा दर 748 रुपयांच्या घसरणीसह उघडला आहे. देशातील महागाई आणखी वाढणार नाही, SBI च्या रिपोर्टमध्ये दावा; रेपो दर आणखी वाढण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची खरेदी वेगाने होत आहे. अमेरिकेत सोन्याचा भाव 7.93 डॉलरच्या वाढीसह 1,828.39 डॉलर प्रति औंस झाला. दुसरीकडे, चांदी 0.16 डॉलरच्या वाढीसह 21.28 डॉलर प्रति औंस पातळीवर व्यवहार करत आहे. सोन्याची शुद्धता कशी तपासणार? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात