Gold Price Today: या आठवड्यात पहिल्यांदा स्वस्त झालं सोनं, डॉलरमधील तेजीमुळे उतरले दर

Gold Price Today: या आठवड्यात पहिल्यांदा स्वस्त झालं सोनं, डॉलरमधील तेजीमुळे उतरले दर

US Election Result 2020 या जगातील सर्वात मोठ्या घडामोडीचा परिणाम बुलियन मार्केटवर देखील होताना दिसत आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर: सोन्याच्या वाढण्यारा किंमतीचा ग्राफ शुक्रवारी काहीसा थांबलेला पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारात दर उतरल्यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याचे भाव कमी झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निकालात जो बायडन (Joe Biden) यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अद्याप याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही आहे. मात्र बायडन यांच्या विजयाची अपेक्षा वाढल्याने आंतरराष्ट्री बाजारात सोन्यामध्ये तेजी आली आहे. अशी अपेक्षा केली जात आहे की, डेमोक्रेट्सकडून रिपब्लिकनच्या तुलनेत अधिक विस्तृत आर्थिक पॅकेज दिले जाईल. त्यातच बायडन यांच्या विजयाच्या आशा अधिक वाढल्या आहे. त्यामुळे शेअर बाजारात तेजी आहे तर अमेरिकन डॉलरमध्ये घसरण झाली आहे. ज्याचा परिणाम बुलियन मार्केटवर झालेला दिसतो आहे.

सोन्याचे दर (Gold Price, 5 November 2020) -

दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचे भाव 158 रुपयांनी वाढले होते. यानंतर नवे दर 50,980 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. बुधवारी सोन्याचे दर 50,822 रुपये प्रति तोळावर ट्रेड करणं बंद झाले होते.

चांदीचे दर (Silver Price, 5 November 2020) -

गुरुवारी सोन्याबरोबरच चांदीमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. दिल्लीतील  सराफा बाजारात चांदीचे दर 697 रुपयांनी वाढून 62,043 रुपये प्रति किलो झाले होते. एक दिवस आधी बाजार बंद होताना चांदी  61,346 रुपये प्रति किलो होती.

(हे वाचा-दिवाळीला खरेदी करू शकता सोन्याचे दागिने! हे प्रसिद्ध ज्वेलर्स देत आहेत खास ऑफर्स)

कोरोनाचे  वाढते संक्रमण आणि अनिश्चिततेमुळे सोन्याचे भाव येणाऱ्या काळात वाढू शकतात. अशावेळी विविध केंद्रीय बँका भविष्याचा विचार करता अधिकाधिक सोने खरेदी करत आहेत. त्याचप्रमाणे अमेरिका-चीन व्यापार तणाव आणि भारत-चीन सीमावाद यामुळे देखील आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेची स्थिती वाढत आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन फेडरल रिझर्व्हने असे संकेत दिले आहेत की, व्याजदर 2023 पर्यंत शुन्याच्या आसपास असतील.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 6, 2020, 11:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading