• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • वायदे बाजारात सोन्याचे भाव 45,000 पेक्षा जास्त, जूनपर्यंत किंमत 50 हजार गाठण्याची शक्यता

वायदे बाजारात सोन्याचे भाव 45,000 पेक्षा जास्त, जूनपर्यंत किंमत 50 हजार गाठण्याची शक्यता

सोन्याच्या किंमती वायदे बाजारात मोठ्या प्रमाणात वाढल्याचं गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. फ्यूचर मार्केटमध्ये प्रति तोळा सोन्याची किंमत 2000 रुपयांनी वाढत सोनं 45,724 रुपयांवर पोहोचलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 07 एप्रिल : कोरोनाचा (Coronavirus Pandemic) मोठा फटका उद्योग-व्यवसायांना बसला आहे. सोन्याची उलाढालीवरही कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. भारतामध्ये सध्या 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यामुळे दिल्लीतील सराफा बाजार बंद आहे. मात्र बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळाल. सोन्याची किंमत प्रति तोळा 1,185 रुपयांनी वाढून 45,121 रुपयांवर पोहोचली आहे. तर चांदीमध्ये देखील प्रति किलो 1,890 रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर या किंमती देण्यात आल्या आहेत. (हे वाचा-COVID-19 : गरिबांना मोदी सरकाराचा मदतीचा हात, आर्थिक साहाय्यासाठी 6,834 कोटी) देशभरात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. 25 मार्चपासून 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान या परिस्थितीमध्ये देशातील सर्व औद्योगिक आणि आर्थिक बाजार बंद आहेत. सोन्याचे बाजार देखील ठिकठिकाणी बंद ठेवण्यात आले आहेत. याचा परिणाम सोन्याचा किंमतीवर होत आहे. वायदे बाजारात सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या सोन्याच्या किंमती वायदे बाजारात मोठ्या प्रमाणात वाढल्याचं गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. फ्यूचर मार्केटमध्ये प्रति तोळा सोन्याची किंमत 2000 रुपयांनी वाढत सोनं 45,724 रुपयांवर पोहोचलं आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. एमसीएक्समध्ये जूनच्या वायदे भावात 3.5 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. त्यानंतर सोन्याचे भाव 45,269 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर Siver Future मध्ये 5 टक्क्यांनी वाढ होत किंमत प्रति तोळा 43,345 रुपये झाली आहे. सोन्याचे भाव आणखी वाढणार आर्थिक मंदीची चाहूल लागल्यामुळे सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे, असं मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. भारतीय वायदा बाजारात सोन्याची किंमत जूनपर्यंत प्रति तोळा 50 हजारांवर जाण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 2000 डॉलर प्रति औंस होऊ शकते. याचा परिणाम देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर होणार आहे. जूनपर्यंत सोन्याच्या किंमती 50,000 च्या घरात जाऊ शकतात.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: