नवी दिल्ली, 11 जून : सोनं हे भारतात आजही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. यासोबतच जास्तीत जास्त सोनं खरेदी करण्याची क्रेझ भारतीयांमध्ये आहे. दरम्यान आता सोन्याचे भाव 60 हजारांच्या आसपास पोहोचले आहेत. याच कारणामुळे कोणाला सोनं खरेदीही करायचं नसेल तरीही त्याची किंमत काय हे जाणून घेण्यात सर्वांना रस असतो. आज सोन्याच्या किंमती या 60 हजारांपर्यंत पोहोचल्या आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत सोन्याच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या काळात सोन्याच्या किमती कित्येक पटींनी वाढल्या आहेत. गेल्या 76 वर्षात सोन्याची किंमत कधी आणि कितीने वाढल्या जाणून घेऊया.
पहिल्यांदा 100 रुपयांचा भाव कधी ओलांडला?
देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी म्हणजेच 1947 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 88 रुपये होती. 11 वर्षांनंतर म्हणजेच 1959 मध्ये पहिल्यांदा सोन्याच्या किमतीने 100 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा पार केला. त्याच वेळी, 1975 पर्यंत सोन्याने 500 ची पातळी ओलांडली होती. आजपासून 15 वर्षे मागे वळून पाहिले तर 2007 साली सोन्याचा भाव 10,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. ऑगस्ट 2020 मध्ये, त्याने 56,191 चा रेकॉर्ड पार केला. सध्या सोन्याची किंमत सुमारे 60 हजार आहे. बाजारातील लेटेस्ट आकडेवारीनुसार सोन्याचा भाव 59,980 रुपये आहे.
आता विकता येणार नाहीत जुने दागिने! हॉलमार्किंगचं नियोजन बिघडलं, नवा नियम काय?आतापर्यंत सोन्यानं दिलंय 68000 हजार टक्के रिटर्न
गुंतवणुकीच्या सर्व ऑप्शनमध्ये रिटर्नच्या बाबतीत सोनं सर्वात टॉपवर आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत सोन्याने सुमारे 68000 टक्के रिटर्न दिलंय. म्हणजेच या वर्षांत सोन्याच्या किमतीत सुमारे 680 पट वाढ झालीये. अशा परिस्थितीत, गुंतवणुकीसाठी हा सर्वकालीन सर्वोच्च रिटर्न देणारा ऑप्शन आहे. सोन्याच्या व्यवसायाशी संबंधित तज्ज्ञांच्या मते, सोने खरेदी करताना त्याची शुद्धता आणि हॉलमार्किंगची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्याच वेळी, हॉलमार्किंग आणि रेट त्याच्या बिलात लिहिणे आवश्यक आहे.
उतार-चढावादरम्यान चांगले रिटर्न देते सोनं
मार्केटमधील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, फिजिकल सोने खरेदी आणि दागिने बनवण्याव्यतिरिक्त तुम्ही डिजिटल सोन्यातही गुंतवणूक करू शकता. गोल्ड ईटीएफ, गोल्ड बाँड आणि गोल्ड एमएफमध्ये गुंतवणूक करता येते. सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे दागिने, सोन्याची नाणी, ईटीजी सोने, सॉवरेन गोल्ड बॉन्ड, डिजिटल गोल्ड आणि गोल्ड डेरिव्हेटिव्ह असे अनेक गुंतवणूक ऑप्शन आहेत. बाजारातील चढ-उतार सोन्याला चांगले रिटर्न देतात.