मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Rate Today: रोज वाढतायंत सोन्याचांदीचे दर, तरीही 8600 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; वाचा सविस्तर

Gold Rate Today: रोज वाढतायंत सोन्याचांदीचे दर, तरीही 8600 रुपयांनी स्वस्त आहे सोनं; वाचा सविस्तर

सणासुदीचा काळ सुरू आहे (Festive Season Shopping), काही दिवसांतच दिवाळी सुरू होणार आहे. यासह सोन्याचांदीच्या (Gold Silver Price) किंमतींनीही जोर पकडला आहे. मात्र अशावेळीही तुम्ही सोनंखरेदीचा विचार करत असाल तर आताच योग्य वेळ आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर: सणासुदीचा काळ सुरू आहे (Festive Season Shopping), काही दिवसांतच दिवाळी सुरू होणार आहे. यासह सोन्याचांदीच्या (Gold Silver Price) किंमतींनीही जोर पकडला आहे. अशावेळी तुम्ही सोनंखरेदीचा विचार करत असाल तर आताच योग्य वेळ आहे. कारण जरी दररोज किंमती वाढत असल्या तरीही रेकॉर्ड हायपेक्षा अजूनही सोन्याचे दर 8600 रुपयांनी कमी आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर आज डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 0.35 टक्क्यांनी वधारले आहेत. तर चांदीच्या दरात (Silver price Today) 0.49 टक्क्यांनी तेजी आली आहे. 56,200 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते सोन्याचे दर 2020 बद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या ऑगस्टमध्ये, MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती.  MCX वर आज डिसेंबरच्या सोन्याची वायदे किंमत सोने 47,568 रुपये प्रति तोळावर आहे. म्हणजेच आज सोने सुमारे 8632 रुपयांनी स्वस्त आहे. वाचा-PM शेतकरी सन्मान निधी योजनेच्या नियमात बदल, लाभ मिळवण्यासाठी लागणार हा दस्तावेज काय आहे सोन्याचांदीची किंमत? आज डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 0.35 टक्क्यांनी वधारले आहेत, या वाढीनंतर सोन्याचे दर  47,568 रुपये प्रति तोळावर आहेत. चांदीच्या दरात 0.49 टक्क्यांनी तेजी आली आहे, आणि यानंतर चांदी 65,333 रुपये प्रति किलोवर आहे. आणखी वाढणार सोन्याचे दर तज्ज्ञांच्या मते दिवाळी ते डिसेंबर पर्यंत सोन्याची किंमत 57 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर 76,000 ते 82,000 रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकतात. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल. वाचा-25 ऑक्टोबरपासून मोदी सरकार विकत आहे स्वस्त सोनं, ऑनलाइन खरेदीवर मिळेल सूट अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.
First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, The gold

पुढील बातम्या