मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price: आतापर्यंत 12,927 रुपयांची घसरण; सोन्यात गुंतवणूक करावी का, पाहा काय आहे जाणकारांचं म्हणणं

Gold Price: आतापर्यंत 12,927 रुपयांची घसरण; सोन्यात गुंतवणूक करावी का, पाहा काय आहे जाणकारांचं म्हणणं

दिल्ली सराफा बाजारात 7 ऑगस्ट 2020 रोजी सोन्याचा दर 57,008 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला होता. चांदीचा दरही सर्वोच्च स्तरावर होता. परंतु जस-जसं कोरोना वॅक्सिनबाबत चांगल्या बातम्या येऊ लागल्या तसे सोन्याचे दर खाली येऊ लागले.

नवी दिल्ली, 29 मार्च : कोरोना काळात आर्थिक संकट असताना केवळ भारतातच नाही, तर जगभरातील अनेकांचा सोन्याच्या गुंतवणुकीकडे कल होता. त्यामुळेच गुंचवणुकदारांच्या जबरदस्त खरेदीमुळे मागील वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर रेकॉर्ड स्तरावर पोहचले होते. दिल्ली सराफा बाजारात 7 ऑगस्ट 2020 रोजी सोन्याचा दर 57,008 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला होता. चांदीचा दरही सर्वोच्च स्तरावर होता. परंतु जस-जसं कोरोना वॅक्सिनबाबत चांगल्या बातम्या येऊ लागल्या तसे सोन्याचे दर खाली येऊ लागले. आर्थिक व्यवहार काहिसे सुरळित होत असताना, गुंतवणूकदारांनी इतर गुंतवणुकीकडे वळण्यास सुरुवात केली.

गेल्या वर्षी 7 ऑगस्ट 2020 च्या रेकॉर्ड स्तरावरुन, शुक्रवारी 26 मार्च 2021 पर्यंत सोने दरात 12,927 रुपयांची घसरण झाली आहे. शुक्रवारी सोन्याचा दर 44,081 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तसंच गेल्या वर्षी 7 ऑगस्ट 2020 रोजी चांदी 77,840 रुपये प्रति किलोग्रॅम होती, तर शुक्रवारी 26 मार्च 2021 रोजी चांदीचा दर 64,276 रुपयांवर आहे. रेकॉर्ड स्तरावरुन चांदीचा दर 13,564 रुपयांनी घसरला आहे.

(वाचा - केवळ 94 पैसे दररोज खर्च करुन मिळवा 4 लाखांचा इन्शोरन्स, घरबसल्या असा घ्या फायदा)

काय आहे जाणकारांचं म्हणणं -

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोना वॅक्सिनेशन अभियान वेगात सुरू असून गुंतवणुकदार गुंतवणुकीसाठी इतर पर्यायांकडे वळले आहेत. त्यामुळेच सोन्याचे दर घसरले आहेत. परंतु ही स्थिती अधिक काळ राहणार नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. शेअर बाजारात अधिक फायद्यासह, जोखीमही जास्त असल्याने मोठ्या संख्येत गुंतवणुकदार पुन्हा एका सुरक्षित गुंतवणुकीकडे वळू शकतात. त्यामुळे पुन्हा सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

(वाचा - केवळ 15000 रुपयांत सुरू करा तुळशीची शेती; 3 लाखांपर्यंत होईल कमाई)

2021 मध्ये सोन्याच्या किंमती 63 हजारांपर्यंत पोहचू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्याच्या किंमतीत सोन्यात गुंतवणूक करणं फायद्याचं ठरू शकतं, असं जाणकारांचं म्हणणं आहे. याचा फायदा घेत पुढे अधिक काळासाठी चांगला फायदा मिळवता येऊ शकतो.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today