मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today : पाच दिवसांत 3500 रुपये स्वस्त झालं सोनं, तपासा 10 ग्रॅमचा आजचा भाव

Gold Price Today : पाच दिवसांत 3500 रुपये स्वस्त झालं सोनं, तपासा 10 ग्रॅमचा आजचा भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे रेट कमी झाल्याने मंगळवारी भारतीय बाजारातही सोने-चांदी (Gold-Silver Rate) दर स्वस्त झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे रेट कमी झाल्याने मंगळवारी भारतीय बाजारातही सोने-चांदी (Gold-Silver Rate) दर स्वस्त झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे रेट कमी झाल्याने मंगळवारी भारतीय बाजारातही सोने-चांदी (Gold-Silver Rate) दर स्वस्त झाला आहे.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 15 मार्च : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे रेट कमी झाल्याने मंगळवारी भारतीय बाजारातही सोने-चांदी (Gold-Silver Rate) दर स्वस्त झाला आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोन्याचा भाव (Gold Price Today) 325 रुपयांनी कमी झाला आहे. मागील पाच दिवसांत सोने दरात 3,500 रुपयांची घसरण झाली आहे. आज MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा वायदे भाव 325 रुपयांची कमी झाला. या घसरणीनंतर सोन्याचा दर 51999 रुपयांवर पोहोचला आहे. मागील काही दिवसांपासून सोने दरात सतत घसरण होत आहे. आज MCX वर चांदीचा रेटही (Silver Price Today) 561 रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे आज चांदीचा भाव 68,283 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. मागील आठवड्यात सोन्याचा भाव 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला होता. परंतु केवळ पाच दिवसांत भाव 3500 रुपयांनी कमी झाला आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपण्याची आशा आहे. त्यामुळेच सोने-चांदी दरात ग्लोबल स्तरावर कमजोरी आहे. क्रूड ऑइलचा भावही कमी होऊन 100 डॉलर प्रति बॅरलपर्यंत आला आहे. त्यामुळे जगभरातील शेअर बाजारात हळू-हळू तेजी आहे. गुंतवणुकदार सोन्याशिवाय इतर गुंतवणुकीकडे वळले आहेत. या कारणांमुळे सोने-चांदी दर सतत कमी होत असल्याचं चित्र आहे. मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर - सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.

हे वाचा - EPFO चा नोकरदार वर्गाला मोठा धक्का, 'या' 4 प्रकारे तुम्ही PF बॅलन्स तपासू शकता

कशी तपासाल सोन्याची शुद्धता - तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App' द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
First published:

Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver prices today

पुढील बातम्या