मराठी बातम्या /बातम्या /मनी /

EPFO चा नोकरदार वर्गाला मोठा धक्का, 'या' 4 प्रकारे तुम्ही PF बॅलन्स तपासू शकता

EPFO चा नोकरदार वर्गाला मोठा धक्का, 'या' 4 प्रकारे तुम्ही PF बॅलन्स तपासू शकता

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्या. यानंतर ईपीएफओकडून एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुमच्या पीएफ खात्याची माहिती मिळेल.

    मुंबई, 13 मार्च : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा EPFO ​​ने शनिवारी EPF व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांपर्यंत कमी केल्याने करोडो पगारदार कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या चार दशकांतील हा सर्वात कमी व्याजदर आहे. तुम्ही नोकरी करत असाल तर खाली दिलेल्या पद्धतींनी तुम्ही तुमची PF शिल्लक घरी बसून तपासू शकता. मिस कॉलद्वारे (Missed Call) तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्या. यानंतर ईपीएफओकडून एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुमच्या पीएफ खात्याची माहिती मिळेल. हा कॉल UAN च्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून पाठवावा लागेल. एसएमएसद्वारे (SMS) जर तुमचा UAN EPFO ​​मध्ये नोंदणीकृत असेल, तर तुमचे नवीनतम योगदान आणि PF शिल्लक माहिती मेसेजद्वारे प्राप्त होऊ शकते. यासाठी तुम्हाला EPFOHO UAN ENG 7738299899 वर पाठवावे लागेल. शेवटची तीन अक्षरे भाषेसाठी आहेत. तुम्हाला हिंदीत माहिती हवी असेल तर तुम्ही EPFOHO UAN HIN लिहून पाठवू शकता. हा एसएमएस UAN च्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून पाठवावा लागेल. UPI पेमेंट 15 मार्चपासून आणखी सोपं, Aadhaar OTP ने अॅक्टिव्हेट करता येणार यूपीआय EPFO वेबसाइटद्वारे >> यासाठी तुम्हाला EPFA च्या वेबसाइटवर जावे लागेल. >> येथे Employee Centric Services वर क्लिक करा. >> आता View Passbook वर क्लिक करा. >> पासबूक पाहण्यासाठी UAN ने लॉगिन करा. Share Market : शेअर बाजारात पुढील आठवड्यात कोणते घटक महत्त्वाचे ठरतील? तज्ज्ञांना काय वाटतं?
    उमंग अॅपद्वारे (Umang App) >> तुमचे उमंग अॅप उघडा आणि EPFO ​​वर क्लिक करा. >> आता Employee Centric Services वर क्लिक करा. >> येथे View Passbook पर्यायावर क्लिक करा. >> तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड (OTP) नंबर टाका. >> नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल. >> ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही तुमची पीएफ शिल्लक तपासू शकता.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Epfo news, Investment, PF Amount

    पुढील बातम्या