Gold Rates Today : अनलॉक 1.0 च्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण, असे आहेत आजचे दर

Gold Rates Today : अनलॉक 1.0 च्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण, असे आहेत आजचे दर

देशात कोरोनाव्हायरसचा (Covid-19) प्रसार वेगानं होत असताना केंद्र सरकारनं लॉकडाऊन 5 आणि अनलॉक 1.0 ची घोषणा केली. मात्र याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर झालेला दिसून येत नाही आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 जून : देशात कोरोनाव्हायरसचा (Covid-19) प्रसार वेगानं होत असताना केंद्र सरकारनं लॉकडाऊन 5 आणि अनलॉक 1.0 ची घोषणा केली. मात्र याचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर (Gold Rates Today) झालेला दिसून येत नाही आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. एमसीएक्स (MCX) ऑगस्टमधील दरांमध्ये 0.21% टक्क्यांनी घट होऊन 10 ग्रॅम सोन्याचे दर 47 हजार 007 झाले आहे. मात्र चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. चांदीच्या दरात 0.6% वाढ होऊन प्रति किलोमागे 50 हजार 409 दर झाले आहेत.

तर, आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका आणि चीन यांच्यातील वादामुळं तसेच अमेरिकेत सुरू असलेल्या आंदोलनामुळं सोन्यांच्या किंमती वाढल्या आहेत. या किंमतींमध्ये 1733 डॉलरनं वाढ झाली आहे. दरम्यान भारतात या महिन्याच्या 15 मे रोजी सोन्याच्या किंमतींनी 47,067 रुपये प्रति तोळावर पोहचून एक रेकॉर्ड रचला होता. मात्र लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यामध्ये सोन्याच्या किंमती उतरल्याचे पाहायला मिळत आहे. तर, शुक्रवारी मुंबई बुलियन मार्केट (Mumbai Bullion Market) मध्ये सोन्याचे भाव प्रति तोळा 46929 रुपयांवर येऊन पोहोचले होते. पूर्ण दिवसभरात सोन्याच्या किंमती 66 रुपयांनी कमी झाल्या होत्या.

वाचा-...तरच सरकारनं लॉकडाऊन हटवावा, AIIMSच्या डॉक्टरांनी दिला सल्ला

लॉकडाऊनमध्ये सोन्याच्या किंमतीत झालेले चढउतार

- लॉकडाऊन 1.0 : 25 मार्च ते 14 एप्रिल या 21 दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान एकूण 2,610 रुपये प्रति तोळाने सोन्याच्या किंमती वाढल्या होत्या

- लॉकडाऊन 2.0 : 15 एप्रिल ते 3 मे दरम्यान असणाऱ्या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सोनं एकूण 121 रुपये प्रति तोळाने वधारलं होतं.

- लॉकडाऊन 3.0 : 3 मे ते 17 मे दरम्यान लॉकडाऊनचा तिसरा टप्पा होता. या कालावधीमध्ये सोन्याचे दर 1,154 रुपये प्रति तोळाने वाढले होते. याच काळात सोन्याने 47,000 चा टप्पा पार करत नवे रेकॉर्ड रचले होते.

- लॉकडाऊन 4.0 : किंमती वाढण्याचा पॅटर्न लॉकडाऊन 4 मध्ये खंडित झाला आहे. या टप्प्यातील 3 दिवसांमध्ये सोने 47 हजारांच्या वर होते. 18 मे रोजी सोन्याच्या किंमती 47,861 रुपये, 20 मे रोजी 47,260 रुपये तर 22 मे रोजी 47,100 रुपये प्रति तोळा इतक्या होत्या. तरी देखील शेवटच्या दिवसापर्यंत सोन्याच्या किंमती 932 रुपये प्रति तोळाने कमी झाल्या आहेत.

वाचा-UNLOCK 1.0 : सरकारकडून नवीन गाइडलाइन जारी, वाचा कधी सुरू होणार चित्रपटगृहं

वाचा-लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना आणखी एक झटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ; असे आहेत दर

First published: June 1, 2020, 10:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading