जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Lockdown 5.0: लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना आणखी एक झटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ; असे आहेत नवे दर

Lockdown 5.0: लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना आणखी एक झटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ; असे आहेत नवे दर

Lockdown 5.0: लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांना आणखी एक झटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ; असे आहेत नवे दर

देशातील तेल विपणन कंपन्यांनी HPCL,BPCL, IOC) विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) दरात वाढ जाहीर केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 01 जून : कोरोनाव्हायरसचा (Coronavirus Pandemic) प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन 5.0 जारी करण्यात आला आहे. यातच सर्वसामन्यांना आणखी एक झटका बसला आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी HPCL,BPCL, IOC) विना अनुदानित एलपीजी सिलिंडर (LPG Gas Cylinder) च्या दरात वाढ जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबईत विना अनुदानित एलपीजी गॅसची किंमत आधी 579 होती. आता ही किंमत 590.50 रुपये किंमत झाली आहे. तर 19 किलो सिलिंडरची किंमत 1087.50 रुपये झाली आहे. IOC वेबसाइटवर दिलेल्या किंमतीनुसार आता दिल्लीत 14.2 किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत वाढून 593 रुपये झाली आहे जी 581.50 रुपये होती. त्याच वेळी कोलकातामध्ये 616.00 रुपये, मुंबईत 590.50 रुपये आणि चेन्नईत 606.50 रुपये झाली आहे. याआधी हीच किंमत अनुक्रमे 584.50, 579.00 आणि 569.50 रुपये होते. तर, 19 किलो LPG सिलिंडरचे दरही वाढविण्यात आले आहेत, आजपासून नवे दर लागू झाले आहेत. मुंबईत 19 किलो एलपीजी सिलिंडर 1.87.50 रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे कोलकातामध्ये त्याचे भाव वाढून 1193.50 रुपये, दिल्ली 1139.50 रुपये आणि चेन्नईत 1254.00 रुपये झाले आहेत.

News18

Whatsapp वरून बुक करता येणार सिलिंडर भारत पेट्रोलियम कोर्पोरेश लिमिटेड (BPCL) कंपनेने ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे. देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे. 5 व्या लॉकडाऊनची तयारी सुरु असतानाचा कंपनीकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. आता देशभरात घरबसल्या आपल्याला सिलिंडर बुक करता येणार आहे. Whatsapp चा वापर करून आपण सिलिंडर घरबसल्या बुक करू शकता. देशातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकावरची पेट्रोलियम वितरण कंपनी म्हणून ओळख आहे. याशिवाय 7.10 कोटी एलपीजी ग्राहक आहेत. मंगळवारपासून देशभरातील भारत गॅस (भारत गॅस) ग्राहक व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून कुठूनही सिलिंडर बुक करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात