Home /News /money /

Gold Price Today: उच्चांकी स्तरावरुन सोने दरात मोठी घसरण, तर चांदीचा भाव वधारला; वाचा आजचा लेटेस्ट रेट

Gold Price Today: उच्चांकी स्तरावरुन सोने दरात मोठी घसरण, तर चांदीचा भाव वधारला; वाचा आजचा लेटेस्ट रेट

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्याने, भारतीय बाजारातही त्याचा परिणाम दिसतो आहे. जाणकारांचं असं म्हणणं आहे की, सोने दरात 2021 मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली, 8 मार्च : भारतीय बाजारात सोमवारी सोने दरात मोठी घसरण झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी 8 मार्च 2021 रोजी सोन्याचा भाव (Gold Price Today) 122 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरला. तर चांदीच्या दरात (Silver Price Today) 587 रुपये प्रति किलोग्रॅमने वाढ झाली आहे. सोन्याचा आजचा नवा दर (Gold Price, 8 March 2021) - दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोने दरात 122 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण झाली. दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा दर आता 44,114 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. याआधीच्या सत्रात सोन्याचा दर 44,236 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. चांदीचा आजचा भाव (Silver Price, 8 March 2021) - चांदीच्या दरात आज वाढ नोंदवण्यात आली. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर 587 रुपयांनी वधारला आहे. त्यामुळे सोमवारी चांदीचा भाव 65,236 रुपये किलोग्रॅमवर पोहचला आहे.

    (वाचा - LPG Gas Cylinder Subsidy Status:तुमच्या अकाउंटमध्ये गॅस सबसिडी येते का?असं तपासा)

    सोने दरातील घसरणीमागे काय आहे कारण? एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Securities) सीनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्याने, भारतीय बाजारातही त्याचा परिणाम दिसतो आहे. न्यूयॉर्कच्या कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याचा दर कमी झाल्याने, दिल्ली सराफा बाजारातही सोन्याचे दर गडगडले. दरम्यान, जाणकारांचं असं म्हणणं आहे की, सोने दरात 2021 मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सोने दरात वाढ सुरू झाल्यास, सोन्याचा जर 63000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचण्याचा जाणकारांचा अंदाज आहे. सोन्याच्या किंमतीतील घसरण तात्पुरती आणि कमी काळासाठी असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
    Published by:Karishma
    First published:

    Tags: Gold and silver prices today, Gold prices today

    पुढील बातम्या