मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price: गोल्ड रेटमध्ये विशेष तेजी, 50000 रुपयांपार कधी जाणार सोन्याचे भाव?

Gold Price: गोल्ड रेटमध्ये विशेष तेजी, 50000 रुपयांपार कधी जाणार सोन्याचे भाव?

सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. याची प्रचिती यंदाच्या दिवाळीतही आली. यावर्षी दिवाळीत सोन्याची मोठी विक्री झाल्याचे जाणकार सांगतात. दरम्यान देशांतर्गत बाजारात सोन्याचा दर प्रति तोळा 50,000 रुपयांच्या दिशेने वाढत आहे.

सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. याची प्रचिती यंदाच्या दिवाळीतही आली. यावर्षी दिवाळीत सोन्याची मोठी विक्री झाल्याचे जाणकार सांगतात. दरम्यान देशांतर्गत बाजारात सोन्याचा दर प्रति तोळा 50,000 रुपयांच्या दिशेने वाढत आहे.

सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. याची प्रचिती यंदाच्या दिवाळीतही आली. यावर्षी दिवाळीत सोन्याची मोठी विक्री झाल्याचे जाणकार सांगतात. दरम्यान देशांतर्गत बाजारात सोन्याचा दर प्रति तोळा 50,000 रुपयांच्या दिशेने वाढत आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून सोन्याचांदीच्या (Gold and Silver Rate Today) किंमतीत मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळतो आहे. दरम्यान गुरुवारी 11 नोव्हेंबर 2021 रोजी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव 883 रुपयांनी वाढून 48,218 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. त्याचवेळी चांदीचा भावही 1,890 रुपयांनी वाढून 65,190 रुपये प्रति किलोवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावरही सोन्याच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली. याठिकाणी सोन्याचा भाव 1,856 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. काही दिवसांपासून सोन्यासोबत चांदीच्या किंमतींमध्येही वाढ होत आहे. दरम्यान असे असले तरीही हे दोन्ही मौल्यवान धातूंचा दर रेकॉर्ड हाय स्तरापेक्षा कमी आहे. याचा गुंतवणूकदारांना फायदाच होत आहे. आता सोन्याचा भाव 50 हजार रुपये तोळापार कधी जाईल, असा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर उपस्थित होत आहे.

हे वाचा-Nykaa चे शेअर 5 टक्क्यांची घसरले; आता गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचं मत काय?

सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. याची प्रचिती यंदाच्या दिवाळीतही आली. यावर्षी दिवाळीत सोन्याची मोठी विक्री झाल्याचे जाणकार सांगतात. सणांचा हंगाम संपल्यानंतर आता लग्नसराई सुरू होत आहे. देशात लग्नसराईच्या काळात सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. अशा स्थितीत सोन्या-चांदीच्या किमतींना (Gold Silver Price Update) वाढलेल्या मागणीचा आधार मिळतो. सोने पुन्हा एकदा हळूहळू 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दिशेने वाटचाल करत आहे. दरम्यान या काळात चांदीलाही सपोर्ट मिळत आहे कारण सर्वोच्च स्तरावरून चांदी सुमारे 15 टक्के स्वस्त आहे. याचा फायदा चांदीला होत आहे.

सोन्याचा भाव पाच महिन्यांच्या उच्चांकावर

अमेरिकेत वाढत्या किरकोळ महागाईमुळे सोन्याची झळाळी वाढत आहे. सोन्याचा भाव पाच महिन्यांच्या उच्चांकावर आहे. कॉमेक्सवर सोने 1860 च्या जवळ पोहोचले आहे. तर देशांतर्गत बाजारात सोन्याचा दर प्रति तोळा 50,000 रुपयांच्या दिशेने वाढत आहे. अमेरिकन बाँडचे उत्पन्न देखील 1.47 टक्क्यांवरून 1.57 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्याचवेळी भारतात दिवाळीनंतर लग्नसराईच्या काळात सोन्याची मागणी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हे वाचा-Petrol-Diesel Price Today: आज मुंबईत पेट्रोल 110 रुपयांवर, डिझेलही नव्वदीपार!

दिवाळीत देशामध्ये झाली 45 टन सोन्याची विक्री

दिवाळीच्या मुहूर्तावर भारतात सोन्याची विक्रमी विक्री झाली आहे. देशभरात सुमारे 45 टन सोन्याची विक्री झाली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) नुसार, दिवाळीत 75,000 कोटी रुपयांच्या दागिन्यांची विक्री झाली आहे. एकट्या दिल्लीत 9 हजार कोटी रुपयांचे सोने विकले गेले आहे. अंदाजानुसार, या कालावधीत कोविडपूर्व पातळीपेक्षा सुमारे 30-35 टक्के अधिक विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डिजिटल सोन्याची विक्री दुपटीने वाढली आहे.

चांदी 3 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आहे

चांदीच्या दरानेही 3 महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. सोने, बेस मेटल्सच्या वाढीचा फायदा चांदीला झाला आहे. चांदीच्या मागणीतही तेजी दिसून आली आहे. सणासुदीला ज्वेलरी क्षेत्रातून जोरदार मागणी होत आहे. अमेरिकेतील वाढत्या किरकोळ महागाईमुळे चांदीच्या दरालाही आधार मिळत आहे.

First published:
top videos

    Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price