जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तुमच्या सॅलरीचाच भाग असतो का बोनस? कोणाला किती द्यावा हे कसं ठरवलं जातं?

तुमच्या सॅलरीचाच भाग असतो का बोनस? कोणाला किती द्यावा हे कसं ठरवलं जातं?

तुमच्या सॅलरीचाच भाग असतो का बोनस? कोणाला किती द्यावा हे कसं ठरवलं जातं?

दिवाळी या सणाची काही जण आतूरतेनं वाट पाहात असतात. त्याचं कारण म्हणजे दिवाळीवेळी मिळणारा बोनस आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : दिवाळी या सणाची काही जण आतूरतेनं वाट पाहात असतात. त्याचं कारण म्हणजे दिवाळीवेळी मिळणारा बोनस आहे. हा बोनस एकरकमी खात्यावर येतो. यावेळी अनेकजण नवीन वस्तू खरेदी करतात किंवा काही जण ते पैसे गुंतवतात, तरुण वर्ग आपली हौस-मौज पूर्ण करतो. पण हा बोनस मिळतो म्हणजे नक्की काय? तुम्हाला माहितीय का तो आपल्याच पगाराचा एक हिस्सा असतो. बोनस ही कर्मचाऱ्याला त्याच्या नियमित पगाराव्यतिरिक्त दिली जाणारी अतिरिक्त रक्कम असल्याचं म्हटलं जातं. कंपनी/ संस्था सहसा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात प्रोत्साहन देणं किंवा त्याचा मोबदला म्हणून बोनस देतात. कंपनीतील कामाची उत्पादकता वाढविण्यासाठी बोनस दिला जातो. आपला मूळ पगार आणि बोनस एकत्र करून आपले वार्षिक उत्पन्न ज्याला TCTC असं म्हणतात ते कंपनी देत असते. त्यामुळे त्यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे, हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की तो तुमच्या पगारातून दिला जात नाही तर तो तुमचा एक भ्रम आहे.

तुम्हाला मिळणाऱ्या ‘बोनस’ची सुरुवात नक्की कशी झाली?

वेगवेगळ्या प्रकारचे बोनस असतात, साधारण कर्मचाऱ्यांच्या परफॉर्मन्सवर एक दिला जातो. दुसरा बोनस हा तुमच्या ऑफर लेटरमध्ये दिलेला नसतो पण तो कंपनीच्या मॅनेजर आणि मॅनेजमेंट टीमवर अवलंबून असतो. हा बोनस त्याच वेळी दिला जातो ज्यावेळी एखादा कर्मचारी काहीतरी वेगळं आणि कंपनीच्या दुप्पट फायद्याचं काम करतो. कंपनी आपल्या मनाने बोनस देऊ शकत नाही. त्यासाठी देखील काही नियम आणि अटी ठेवण्यात आल्या आहेत. 1965 च्या पेमेंट ऑफ बोनस कायद्याचे उद्दीष्ट नफा आणि उत्पादकतेच्या आधारे व्यवसायातील कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनसच्या रकमेचे नियमन करणे हे आहे. हा कायदा संपूर्ण भारतात वर्षाच्या कोणत्याही दिवशी वीस किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या सर्व आस्थापनांना लागू होतो. 20 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थेमधील प्रत्येक कर्मचाऱ्याला बोनस मागण्याचा हक्क आहे असं या कायद्यातील तरतूदी सांगतात. त्यासाठी त्या कर्मचाऱ्याला जास्तीचे 30 दिवस काम करावे लागेल.

News18लोकमत
News18लोकमत

कंपनी किंवा संस्थेला कमीतकमी 8.33% दराने आणि जास्तीत जास्त 20% दराने बोनस द्यावा लागतो. ज्या कर्मचाऱ्याला कंपनीत एक वर्ष पूर्ण झालं आहे त्यांना हा बोनस मिळतो. कर्मचाऱ्याला बडतर्फ केले जाते आणि फसवणूक, शिवीगाळ आणि अशी कोणतीही परिस्थिती निर्माण केल्यास त्याला बोनसही मिळत नाही. ज्यांचा पगार 21 हजार रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना कंपनीला बोनस द्यावाच लागतो. 7,000 x 8.33/100 यामध्ये बेसिक सॅलरी + डियरनेस अलाउंस (डीए) असं धरलं जातं. 8.33 टक्के बोनस या कर्मचाऱ्याला मिळणार.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: money , Salary
  • First Published :
जाहिरात
जाहिरात