मराठी बातम्या /बातम्या /मनी /Mutual Fund: 1000 रुपयांपासून गुंतवणूक करून मिळवा चांगला नफा, 30 जुलैपासून मिळेल संधी

Mutual Fund: 1000 रुपयांपासून गुंतवणूक करून मिळवा चांगला नफा, 30 जुलैपासून मिळेल संधी

महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंडाने (Mahindra Manulife Mutual Fund) फ्लेक्सी कॅप (Flexi Cap) नावाने नवी फंड ऑफर (New Fund Offer) सादर केली आहे.

महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंडाने (Mahindra Manulife Mutual Fund) फ्लेक्सी कॅप (Flexi Cap) नावाने नवी फंड ऑफर (New Fund Offer) सादर केली आहे.

महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंडाने (Mahindra Manulife Mutual Fund) फ्लेक्सी कॅप (Flexi Cap) नावाने नवी फंड ऑफर (New Fund Offer) सादर केली आहे.

    नवी दिल्ली, 29 जुलै: महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंडाने (Mahindra Manulife Mutual Fund) फ्लेक्सी कॅप (Flexi Cap) नावाने नवी फंड ऑफर (New Fund Offer) सादर केली आहे. ही एक ओपन एंडेड डायनामिक इक्विटी स्कीम (Open Ended Dynamic Equity Scheme) असून, त्याद्वारे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप अशा सर्व मार्केट कॅपमध्ये (Market Cap) गुंतवणूक केली जाणार आहे. महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष बिश्नोई यांनी सांगितलं, की कोविडची दुसरी लाट असूनही भारतीय शेअर बाजारातली (Indian Share Markets) तेजी कायम आहे.

    मार्च 2020मध्ये घोषित झालेल्या लॉकडाउनवेळच्या तुलनेत बेंचमार्क इंडायसेस (Benchmark Indices) दुपटीच्या पातळीवर आहेत; मात्र जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये सध्या असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अनिश्चिततांमुळे इक्विटी बाजारात अस्थिरता असू शकते. मार्केट सायकलमध्ये स्थिर रिटर्न्स देण्याची क्षमता फ्लेक्सी कॅप फंडमध्ये आहे. रिस्क आणि रिटर्न्स यांमध्ये संतुलन राखणं हे या फंडचं वैशिष्ट्य आहे.

    हे वाचा-Aadhaar Card बनवण्याच्या नियमात बदल, केवळ एक स्लिप देऊन पूर्ण होईल काम

    कंपनीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, नवी फंड ऑफर 30 जुलै रोजी सुरू होईल आणि 13 ऑगस्ट 2021 रोजी बंद होईल. ही स्कीम कायमस्वरूपी खरेदी-विक्रीसाठी 25 ऑगस्ट 2021 रोजी खुली होईल. यामध्ये कमीत कमी एक हजार रुपये गुंतवणं आवश्यक असून, एसआयपी स्वरूपात गुंतवणूक करायची असेल तर 500 रुपयांची गुंतवणूक करणं शक्य आहे. महिंद्रा मॅन्युलाइफ फ्लेक्सी कॅप योजना इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित सिक्युरिटीजमध्ये कमीत कमी 65 टक्के गुंतवणूक करील. 35 टक्के गुंतवणूक डेट आणि मनी मार्केट सिक्युरिटीजमध्ये (Money Market Securities) करण्याचा पर्याय योजनेकडे असेल, ज्यात ट्राय पार्टी रेपो आणि रिव्हर्स रेपोही असेल. 10 टक्क्यांपर्यंतची गुंतवणूक रिट आणि इनविटद्वारा जारी करण्यात आलेल्या युनिटमध्ये केली जाईल.

    चतुर इन्व्हेस्टमेंटचे संदीप भू शेट्टी सांगतात, की गरजेनुसार मिड कॅपकडून स्मॉल कॅपमध्ये स्विच करण्यासाठीची फ्लेक्झिबिलिटी अशा फंड्सना अधिक उपयुक्त बनवते. ज्यांना डायव्हर्सिफाइड फंड्स पाहिजे आहेत, अशा गुंतवणूकदारांसाठी महिंद्रा मॅन्युलाइफ फ्लेक्सी कॅप योजना आदर्श आहे. अंतर्गत गुंतवणूक आराखड्याची उत्तम प्रक्रिया या फंडाकडे आहे. स्टॉकच्या योग्य मूल्यांकनासाठी त्याचा उपयोग केला जातो.

    हे वाचा-Gold Price Today: सोन्याचांदीच्या किंमतीत आज तेजी, काय आहे प्रति तोळाचा आजचा भाव

    इक्विटी आणि इक्विटीशी संबंधित सिक्युरिटीजमध्ये मार्केट कॅपिटलायझेशनच्या डायव्हर्सिफाइड पोर्टफोलिओमध्ये (Diversified Portfolio) गुंतवणूक करून दीर्घकाळात आपली गुंतवणूक वाढवू इच्छितात, अशांसाठी ही स्कीम चांगली आहे. मार्केट कॅपिटलायझेशनच्या सगळ्या संधींमध्ये गुंतवणूक करण्याची लवचिकता या फंडाकडे असेल.

    First published:

    Tags: Investment, Money, Money debt, Savings and investments