नवी दिल्ली, 23 जून: बुधवारी सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Price Today) किरकोळ तेजी पाहायला मिळाली आहे. एमसीएक्स (MCX Multi Commodity Exchange) वर सोन्याचे दर किरकोळ वाढ होऊन ट्रेड करत आहेत. असं असलं तरीही गेल्या दोन महिन्यातील निचांकी पातळीवर सोन्याचे दर आहे. आज सोन्याचे दर प्रति तोळा 47,000 रुपयांवर आहेत. तर चांदीचे दर 0.46 टक्क्यांनी वाढून 67823 रुपये प्रति किलो झाले आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरॉम पॉवेलद्वारे व्याजदरात तेजीमध्ये वाढ न करण्याचं सांगण्यात आल्यानंतर पॉझिटिव्ह ग्लोबल संकेतांमुळे भारतात सोन्याचे दर वाढले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरात चढउतार कायम आहे. आंतरराष्ट्रीय स्तराबाबत बोलायचे झाले तर याठिकाणी स्पॉट गोल्डची किंमत 0.1 टक्क्याने वाढून 1780.06 डॉलर प्रति औंस झाले आहेत. रॉयटर्सच्या मते अमेरिकेत सोन्याची वायदे किंमत 1,777.60 डॉलर प्रति औंस आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव गुड्सरिटर्न वेबसाइटच्या मते 23 जून 2021 रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव विविध शहरांमध्ये वेगवेगळा आहे. दिल्लीमध्ये 24 कॅरेट प्रति तोळा सोन्याचा भाव 50350 रुपये, चेन्नईमध्ये 48600 रुपये, मुंबईमध्ये 47110 रुपये, कोलकातामध्ये 48980 रुपये तर बंगळुरुमध्ये दर 48110 रुपये आहेत. हे वाचा- या चुकांमुळे मोदी सरकारकडून मिळणाऱ्या 2000 रुपयांना मुकाल,तुम्ही अशा चुका करताय? IBJA नुसार सोन्याचे दर जाणून घ्या बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते सोन्याचे दर काय आहेत. हे दर जीएसटी शुल्काशिवाय असून, विविध शुद्धतेनुसार नमुद करण्यात आले आहेत. » 999 (शुद्धता)- 47,312 रुपये प्रति तोळा » 995- 47,123 रुपये प्रति तोळा » 916- 43,338 रुपये प्रति तोळा » 750- 35,484 रुपये प्रति तोळा » 585- 27,678 रुपये प्रति तोळा » सिल्वर 999- 68,198 प्रति किलो हे वाचा- घरातील सोन्याचं करा हॉलमार्किंग, अन्यथा गोल्ड लोन घेण्यासाठी येतील समस्या दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर वधारले दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी तेजी पाहायला मिळाली होती. दिल्लीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचे दर 46,213 रुपये प्रति तोळा होते. तर चांदीचे दर कमी होऊन 66,389 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. का वाढतायंत सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Securities) सीनिअर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मुल्य 10 पैशांनी घसरलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर किरकोळ कमी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असणाऱ्या चढउतारामुळे आणि रुपयात आलेल्या किरकोळ घसरणीमुळे दिल्लीतील सोन्यात आज किरकोळ वाढ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.