नवी दिल्ली, 02 जून: सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या किंमतीत (Gold Rates) काहीशी घसरण आज पाहायला मिळाली. जर तुम्ही सोनेखरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे, तुम्ही काही प्रमाणात स्वस्त सोनं सध्या खरेदी करू शकता. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange- MCX) सोन्याची वायदे किंमत (Gold price today) 0.15 टक्क्यांनी कमी झाली आहे. या घसरणीनंतर दर 49,363 प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीची वायदे किंमत (Silver Price Today) 0.6 टक्क्यांनी कमी झाली आहे. यानंतर चांदीची वायदे किंमत (Silver Price) 71,832 प्रति किलोग्रॅम झाली आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या घसरणीबद्दल बोलायचं झालं तर रेकॉर्ड हायवरुन सोन्याचे दर जवळपास 7000 रुपयांनी कमी झाले आहे. अर्थात सोनं खरेदी करताना तुम्हाला ते 7000 रुपये स्वस्त दराने मिळू शकतं. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव? 24 कॅरेट सोन्याचे दर दिल्लीमध्ये प्रति तोळा 50990 रुपये या स्तरावर आहेत. मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 50990 रुपये प्रति तोळा, 50800 रुपये प्रति तोळा आणि 50980 रुपये प्रति तोळा आहेत. हे वाचा- आयकर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 7 जूनला लाँच होणार नवीन Income Tax पोर्टल आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काय परिस्थिती? आधीच्या सत्रात सोन्याचे दर गेल्या पाच महिन्यातील सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. मात्र आज आंतरराष्ट्रीय बाजारात देखील घसरण पाहायला मिळाली आहे. मंगळवारी सोन्याचे दर 1,916.40 डॉलर प्रति औंस या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्यानंतर आज स्पॉट गोल्डमध्ये 0.1 टक्क्यांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर दर 1,898.58 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. हे वाचा- तुमचा Aadhar Card वरील फोटो तुम्हाला आवडत नाही? अशाप्रकारे करा बदल मोदी सरकार देत आहे स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी यावर्षातील सॉव्हरेन गोल्ड बाँडची तिसरी सीरिज 31 मे रोजी सुरू झाली आहे. पाच दिवस याअंतर्गत सोन्याची विक्री होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गोल्ड बाँड स्कीमच्या तिसऱ्या सीरिजसाठी इश्यू प्राइस 4,889 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली आहे. अर्थात 10 ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला 4,8890 रुपये मोजावे लागतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.