नवी दिल्ली, 02 फेब्रुवारी: आता गॅस सिलेंडर संपल्यानंतर चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही केवळ एका मिस्ड कॉलच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचे बुकिंग करू शकता. इंडेन गॅसने त्यांच्या ग्राहकांना ही सुविधा दिली आहे. इंडेन गॅसच्या अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे की, 1 फेब्रुवारीपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. तुम्ही Indane Gas केवळ एक मिस्ड कॉल देऊन बुक करू शकता. याशिवाय मिस्ड कॉल करूनच तुम्हाला नवीन कनेक्शन देखील मिळेल. इंडेनच्या या सुविधेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला केवळ तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकाचा वापर करावा लागेल. इंडेन गॅसने ही सुविधा देण्यासाठी एक क्रमांक जारी केला आहे. जर तुम्ही तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून कंपनीने जारी केलेल्या मोबाइल क्रमांकावर मिस्ड कॉल दिला तर तुमचा गॅस सिलेंडर बुक होईल. इंडियन ऑइलने (Indian Oil) एलपीजी ग्राहकांना आता देशातील कोणत्याही भागातून मिस्ड कॉल देऊन सिलेंडर बुक करण्याची सुविधा देत आहेत. मिस्ड कॉलसाठी इंडेनने हा क्रमांक जारी केला आहे- 8454955555. मिस्ड कॉलच्या माध्यमातून सिलेंडर बुक करणे अतिशय सोपी पद्धत आहे. याआधी सिलेंडर बुक करण्यासाठी तुम्हाला एका कॉलवर दीर्घकाळ वाट पाहावी लागत असे. (हे वाचा- BUDGET 2021: सीतारामन यांच्या बजेटमधले 11 महत्त्वाचे मुद्दे, एका क्लिकवर ) शिवाय मिस्ड कॉलच्या माध्यमातून बुकिंग करण्याचा एक फायदा हा देखील आहे की, आयव्हीआरएस कॉल्स प्रमाणे ग्राहकांना याकरता कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही. या सुविधेमुळे त्या लोकांसाठी एलपीजी गॅस बुक करणे सोपे होईल, ज्यांना IVRS कॉल दरम्यान समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे वृद्ध लोकांसाठी देखील ही सुविधा अत्यंत चांगली आहे. या 7 शहरांमध्ये मिळेल वर्ल्ड क्लास क्वालिटीचे पेट्रोल गेल्या महिन्यात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी वर्ल्ड क्लास प्रीमियम ग्रेड पेट्रोल (Octane 100) च्या दुसऱ्या टप्प्याचे अनावरण केले आहे. ज्याला इंडियन ऑइलने XP100 असे नाव दिले आहे. हे पेट्रोल हायएंड कार्ससाठी असेल. XP100 दुसऱ्या टप्प्यामध्ये चेन्नई, बेंगळुरु, हैदराबाद, कोलकाता, कोची, इंदौर आणि भुवनेश्वर या सात अन्य शहरात लाँच केले आहे. याआधी हे केवळ दिल्लीसाठी लाँच करण्यात आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.