नवी दिल्ली, 19 जानेवारी : सोनं-चांदी खरेदी (Gold-Silver Price) करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सोनं खरेदीसाठीची ही चांगली वेळ ठरू शकते. मागील काही दिवसांपासून सोने दरात सतत चढ-उतार सुरू आहेत. आज बुधवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पण चांदीचा दर मात्र वधारला आहे.
काय आहे आजचा रेट -
सोने दर 48 हजारांच्या जवळपास पोहोचला आहे. आज सोने दर 47,925 प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर चांदीच्या दरात 0.22 टक्क्यांची वाढ झाली असून भाव 63,160 रुपये किलो इतका आहे. goodreturns वेबसाइटनुसार, सोन्याचा आजचा दर खालीलप्रमाणे -
महाराष्ट्रातील 24 कॅरेट सोन्याचा दर
शहर | आजचा दर (प्रति तोळा) | कालचा दर (प्रति तोळा) |
मुंबई | 49090 रुपये | 49090 रुपये |
पुणे | 48840 रुपये | 48840 रुपये |
नाशिक | 48840 रुपये | 48840 रुपये |
नागपूर | 49090 रुपये | 49090 रुपये |
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील 22 कॅरेट सोन्याचा दर
शहर | आजचा दर (प्रति तोळा) | कालचा दर (प्रति तोळा) |
मुंबई | 47090 रुपये | 47090 रुपये |
पुणे | 46432 रुपये | 46320 रुपये |
नाशिक | 46320 रुपये | 46320 रुपये |
नागपूर | 47090 रुपये | 47090 रुपये |
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये चांदीचा दर
शहर | आजचा दर (प्रति किलो) | कालचा दर (प्रति किलो) |
मुंबई | 63200 रुपये | 61700 रुपये |
पुणे | 63200 रुपये | 61700 रुपये |
नाशिक | 63200 रुपये | 61700 रुपये |
नागपूर | 63200 रुपये | 61700 रुपये |
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचा दर
सोन्याचे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही सोन्याचे नवे दर पाहू शकता.
कशी तपासाल सोन्याची शुद्धता
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. 'BIS Care App'द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.