नवी दिल्ली, 18 मार्च: सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये (Gold-Silver Price) पुन्हा एकदा उसळी पाहायला मिळते आहे. 18 मार्च रोजी एक तोळा सोन्याचे दर 120 रुपयांनी वाढले आहेत. गुरुवारी सकाळी MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम 12 रुपयांची वाढ झाली आहे. आज भारतात 22 कॅरेट सोन्याचे दर 43,960 रुपये प्रति तोळा आहे. जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहेत सोन्याचे दर. सोन्याचे दर प्रत्येक शहरात वेगळे आहेत कारण सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांवर एक्साइज ड्युटी आणि राज्याकडून कर आकारला जातो. सोन्याची तुमच्या शहरातील किंमत (22 कॅरेट) चेन्नई - 42,370 रुपये मुंबई - 43,960 रुपये पुणे- 43,960 रुपये नागपूर- 43,960 रुपये दिल्ली - 44,150 रुपये (हे वाचा- पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त ? किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय ) कोलकाता- 44,270 रुपये बेंगलुरू- 42,010 रुपये हैदराबाद- 42,010 रुपये केरला- 42,010 रुपये 24 कॅरेट सोन्याची किंमत चेन्नई - 46,220 रुपये मुंबई - 44,960 रुपये दिल्ली - 48,160 रुपये कोलकाता- 46,910 रुपये बेंगलुरू- 45,830 रुपये हैदराबाद- 45,830 रुपये केरला- 45,830 रुपये पुणे- 44,960 रुपये नागपूर- 44,960 रुपये आणखी वाढणार सोन्याचे दर तज्ज्ञांच्या मते पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी येऊ शकते. भारतात लग्नसराईच्या काळात आता सोन्याचांदीच्या किंमतींला सपोर्ट मिळत आहे. त्यामुळे सध्याच्या सोन्याच्या किंमती असताना तुम्ही गुंतवणूक केली तर फायद्याचं ठरू शकतं. तज्ज्ञांच्या मते 2021 साली सोन्याच्या किंमतीमध्ये आणखी वाढ होऊ शकते. असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे की सोन्याच्या दरात 63,000 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात तेजी आहे. अमेरिकेत सोन्याचे दर 0.14 डॉलरने वाढून 1,727.22 डॉलर प्रति औंस झाले आहेत. तर चांदीचे दर 0.09 डॉलरच्या तेजीमुळे 26.02 डॉलर झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.