नवी दिल्ली 18 मार्च : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price)दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्यासाठी सौदी अरेबियासह तेल निर्यात करणाऱ्या देशांची संघटना ओपेक (OPEC) तयार न झाल्यानं भारतानं मोठा निर्णय घेतला आहे. भारत आता सौदी अरेबियामधून होणाऱ्या तेल आयातीत (Oil Import From Saudi Arabia) घट करणार आहे.ओपेक देशांद्वारे कच्च्या तेलाच्या निर्मितीत घट करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं कच्च्या तेलाचे दर 70 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. याच कारणामुळे आता भारतीय ऑईल रिफायनरीजनं अमेरिकेतून जास्तीत जास्त तेल आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, त्यांच्या तेलाच्या किमती कमी आहेत.
जगातील तिसरा सर्वात मोठा आयातदार आहे भारत -
भारत हा चीन आणि जपाननंतर जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे. भारत आपल्या गरजेच्या 80 तेल आयात करतो. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार, भारताच्या स्टेट रिफायनरीनं सौदी अरेबियावरुन केल्या जाणाऱ्या तेल आयातीत घट करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यापर्यंत ही आयात भरपूर कमी केली जाईल.
कच्च्या तेलाच्या किमती कमी करण्याची मागणी करुनही काही फायदा न झाल्यानं मोदी सरकारनं नवीन पर्याय शोधण्यास सुरुवात केली. भारत सरकार आता तेलासाठी असलेलं मध्य पूर्व देशांवरील आपले अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. भारताची रिफायनरी क्षमता दररोज 5 दशलक्ष बॅरल आहे. त्यापैकी 60 टक्के नियंत्रण राज्य रिफायनरीकडे आहे. या सरकारी तेल कंपन्या सौदी अरेबियातून महिन्यात सुमारे 14.8 दशलक्ष बॅरल तेल आयात करतात. ते मेपर्यंत कमी करून 10.8 दशलक्ष बॅरेल करण्याचे नियोजन आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.