Home /News /money /

Gold Price: सोन्याला मिळाली पुन्हा झळाळी, चेक करा 10 ग्रॅम सोन्याचा नवा दर

Gold Price: सोन्याला मिळाली पुन्हा झळाळी, चेक करा 10 ग्रॅम सोन्याचा नवा दर

ग्लोबल बाजारातून मिळालेल्या संकेतांनंतर (Global Cues) शुक्रवारी भारतात सोन्याच्या दरात (Gold Prices) वाढ झाली आहे.

    मुंबई, 20 मे :  ग्लोबल बाजारातून मिळालेल्या संकेतांनंतर (Global Cues) शुक्रवारी भारतात सोन्याच्या दरात (Gold Prices) वाढ झाली. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडियावर (MCX) 20 मे रोजी सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी सोन्याच्या दरांमध्ये 0.09 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा दर 50 हजार 590 रुपये झाला आहे. चांदीच्या (Silver Prices) किमतीमध्ये मात्र घसरण झाली आहे. दरामध्ये 0.08 टक्क्यांची घसरण झाल्यानं चांदी प्रतिकिलो 61 हजार 515 रुपयांना मिळत आहे. डॉलर दोन दशकांतील उच्चांकी स्थितीमध्ये होता. त्यामध्ये घसरण झाल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) शुक्रवारी सोन्याच्या किमतीत वाढ झाली. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, स्पॉट गोल्ड फ्युचर्स (Spot Gold Future) 0.2 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 1 हजार 838.81 डॉलर्सवर आले तर यूएस गोल्ड फ्युचर्स (US Gold Future) 0.1 टक्क्यांनी घसरून 1 हजार 839.30 वर आले आहेत. जागतिक बाजारपेठेमध्ये या आठवड्यात सोन्याच्या किमतींमध्ये सुमारे 1.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. दोन दशकांच्या उच्चांकावर असलेल्या यूएस डॉलरची किंमत काहीशी घसरली आहे. जेव्हा डॉलरच्या किमतीमध्ये घसरण होते तेव्हा इतर चलन धारकांसाठी सोनं खरेदी करणं अधिक स्वस्त होतं. 10 वर्षांच्या यूएस ट्रेझरी उत्पन्नातही (Treasury Yields) घसरण झाली आहे त्यामुळे सोन्याची मागणी वाढली आहे. एसपीडीआर गोल्ड ईटीएफ (SPDR Gold ETF) हा सोन्याचा जगातील सर्वांत मोठा एक्सचेंज-ट्रेडेड फंड आहे. या फंडामध्ये गुरुवारी 0.66 टक्क्यांची वाढ होऊन तो 1 हजार 056.18 प्रतिटनांवर गेला. बुधवारी ही किंमत 1 हजार 049.21 प्रतिटन इतकी होती. रॉयटर्सच्या सर्वेक्षणानुसार, वाढत्या महागाईला (Inflation) आळा घालण्यासाठी यूएस मध्यवर्ती बँक (US Central Bank) या वर्षाच्या अखेरीस अपेक्षेपेक्षा जास्त व्याजदर (Interest Rates) वाढवण्याची शक्यता आहे. वाढत्या व्याजदरांमुळे भविष्यात सोन्याचे दर कमी होऊ शकतात असं मत काही विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे. FD आणि Home loan चे व्याजदर बदलले! कोणती बँक किती देते फायदा? वाचा सविस्तर काय आहे आजची रेंज? शुक्रवारी (20 मे 22) सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किमतींत वाढ झाली नाही आणि जर डॉलरची किंमत घसरत राहिली तर सोन्याच्या किमती फ्लॅट म्हणजे सध्या आहेत तशाच राहतील. काही महत्त्वाची माहिती उपलब्ध न झाल्यास आज बाजारात सोन्याच्या किमती डॉलरला अनुसरून मोजकाच बदल नोंदवतील. आजच्या स्पॉट LBMA सोन्याच्या किमतींची रेंज 1820 डॉलर्स ते 1860 डॉलर्सदरम्यान राहील, असं रिलायन्स सिक्युरिटीजचे (Reliance Securities) सीनिअर रिसर्च अनॅलिस्ट श्रीराम अय्यर (Sriram Iyer) यांनी सांगितलं. 'देशांतर्गत गोल्ड फ्युचर्सच्या किमती स्थिर राहू शकतात. शुक्रवारचं ट्रेड ट्रॅकिंग पूर्णपणे परदेशी बाजारपेठेवर अवलंबून राहू शकतं. रुपया मजबूत स्थितीमध्ये असल्यास आज फायदा होऊ शकतो. एमसीएक्स गोल्ड जूनची (MCX Gold June) आजची रेंज 50 हजार 150 ते 50 हजार 850 रुपये इतकी आहे, असंही श्रीराम अय्यर म्हणाले. 'दरवाढीची चिंता, भू-राजकीय अनिश्चितता आणि वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या किमती अनिर्णायकतेकडे वळत आहेत. तर, मजबूत अमेरिकन डॉलर आणि बाँड यील्डमधील चढ-उतार यांमुळे सोन्याची चमक कमी होत आहे. खरेदी वाढवायची की कमी करायची हे ठरवताना गुंतवणूकदारांचा गोंधळ होत आहे. सोन्यामध्ये काही काळ अनिश्चितता राहू शकते. त्यामुळे 50 हजार 900 च्या टारगेटसाठी 50 हजार 650 रुपयांवरील झोन खरेदी केले पाहिजेत. तर, 50 हजार 100 रुपयांच्या टारगेटसाठी 50 हजार 350 रुपयांखालील झोन खरेदी केले पाहिजेत, असा सल्ला शेअर इंडियाचे (ShareIndia) उपाध्यक्ष आणि संशोधन प्रमुख डॉ. रवी सिंग (Dr Ravi Singh) यांनी दिला आहे. HDFC बँकेच्या ग्राहकांना खुशखबर! बॅंकेकडून FD व्याजदरात वाढ; नवीन व्याजदर चेक करा सोन्याच्या किमतीतील बदल 'ग्लोबल इक्विटी मार्केट्समध्ये तीव्र सेल-ऑफ दिसत आहे. त्यामुळे सोन्याकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला. शिवाय, वाढीच्या मंदावलेल्या लक्षणांमुळे गुंतवणूकदार सोन्याकडं जाण्यास प्रवृत्त झाले आहेत. सोनं हा चलनवाढीसाठी एक चांगला अडथळा (Inflation Hedge) असल्याचं म्हटलं जात आहे. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँकेच्या (Federal Reserve Bank) कठोर धोरणांना प्रतिसाद देत डॉलरच्या किमती (Dollar price) गेल्या दोन दशकांतील सर्वोच्चस्थानी गेल्या आणि डॉलर बळकट झाला. डॉलर बळकट झाल्याने सोन्याची किंमत आणखी वर जाण्याची शक्यता मर्यादित झाली आहे, अशी माहिती बेस मेटल्स आणि एंजल वन लिमिटेडमधील रिसर्च असोसिएट साईश संदीप सावंत देसाई यांनी दिली आहे.
    First published:

    Tags: Gold and silver prices today, Gold price, Gold prices today, Silver prices today

    पुढील बातम्या