Home /News /money /

FD आणि Home loan चे व्याजदर बदलले! कोणती बँक किती देते फायदा? वाचा सविस्तर

FD आणि Home loan चे व्याजदर बदलले! कोणती बँक किती देते फायदा? वाचा सविस्तर

आरबीआयने काही दिवसांपूर्वीच आपल्या रेपो रेटमध्ये बदल केल्याचं जाहीर केलं होते. त्यानंतर आता बँकांनी

आरबीआयने काही दिवसांपूर्वीच आपल्या रेपो रेटमध्ये बदल केल्याचं जाहीर केलं होते. त्यानंतर आता बँकांनी

आरबीआयने काही दिवसांपूर्वीच आपल्या रेपो रेटमध्ये बदल केल्याचं जाहीर केलं होते. त्यानंतर आता बँकांनी...

  मुंबई, १९ मे - आरबीआयने काही दिवसांपूर्वीच आपल्या रेपो रेटमध्ये बदल केल्याचं जाहीर केलं होते. त्यानंतर आता बँकांनी आपापल्या फिक्स्ड डिपॉझिट (FD interest Rates) आणि गृहकर्जावरच्या व्याजदरांत (Home loan interest rates) बदल केले आहेत. त्यामुळे आता एफडीवर मिळणारं व्याज, किंवा गृहकर्जावर भरावं लागणारे व्याज यामध्ये बदल झाला आहे. त्यामुळे तुम्ही एफडी (New FD Rates) उघडण्याचा किंवा गृहकर्ज (New Home loan interest rates) घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. 'बँकबझार' या वेबसाइटने सर्व बँकांचे एफडी आणि गृहकर्जावरच्या व्याजाचे दर प्रसिद्ध केले आहेत.
  कोणत्या बँकेची एफडी फायद्याची?
   
  सर्वप्रथम आपण कोणत्या बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (All Banks FD rates) किती व्याज मिळतंय ते पाहू या. एक कोटी रुपयांहून कमी रकमेच्या आणि एक ते दोन वर्षं कालावधी असणाऱ्या एफडीसाठी बऱ्याच बँका 6.50 टक्के व्याजदर (Interest Rates) देत आहेत. यांमध्ये एयू स्मॉल फायनान्स बँक, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक, इंडस इंडिया बँक, जन स्मॉल फायनान्स बँक, आरबीएल बँक, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक अशा बँकांचा समावेश होतो. याच कालावधीमधल्या एक कोटी रुपयांहून कमी रकमेच्या ठेवीसाठी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank) सर्वाधिक 6.60 टक्के व्याज देते, तर स्कॉटिया बँक (Scotia Bank) सर्वांत कमी 2.40 टक्के व्याज देते. अन्य बँकांचे व्याजदर 3 ते 6 टक्क्यांदरम्यान आहेत. एक कोटी रुपयांहून कमी रकमेच्या 2 ते 3 वर्षांच्या एफडीसाठी सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Suryoday Small Finance Bank) सर्वाधिक 7.00 टक्के व्याज देते. हाच कालावधी आणि रकमेसाठी स्कॉटिया बँक सर्वांत कमी 2.55 टक्के व्याज देते.
   
  लोकप्रिय बँकांचा व्याजदर
  एक कोटी रुपयांहून कमी रकमेच्या 1 ते 2 वर्षं कालावधीच्या ठेवीसाठी अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) 5.60 टक्के, बँक ऑफ इंडिया (BOI) 5.20 टक्के, आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) 5.00 टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 5.20 टक्के तर एचडीएफसी (HDFC) 5.10 टक्के व्याजदर देते. एवढ्याच मर्यादेतल्या रकमेसाठी 2 ते 3 वर्षांच्या ठेवीवर आयसीआयसीआय बँक 5.20 टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया 5.45 टक्के आणि एचडीएफसी बँक 5.20 टक्के व्याज देते. अ‍ॅक्सिस आणि बँक ऑफ इंडिया या बँकांचे व्याजदर दोन्ही कालावधीसाठी सारखेच आहेत.
  इतर बँकांचे दर
   
  बँक 1 ते 2 वर्षांच्या ठेवीसाठी व्याजदर (%) 2 ते 3 वर्षांच्या ठेवीसाठी व्याजदर (%)
   
  बंधन बँक 6.25 6.25
   
  बँक ऑफ बडोदा 5.20 5.20
   
  बँक ऑफ महाराष्ट्र 5.00 4.90
   
  कॅनरा बँक 5.45 5.70
   
  कॅथलिक सीरियन 5.00 5.25
   
  सेंट्रल बँक ऑफ इंडिया 5.25 5.30
   
  सिटी बँक 3.00 3.50
   
  सिटी यूनियन बँक 5.25 5.00
   
  डीबीएस बँक 5.50 5.65
   
  डीसीबी बँक 6.25 6.25
   
  Deutsche बँक 5.50 5.75
   
  धनलक्ष्मी बँक 5.15 5.30
   
  फेडरल बँक 5.35 5.40
   
  एचएसबीसी बँक 3.75 4.00
   
  आयडीबीआय बँक 5.25 5.50
   
  इंडियन बँक 5.10 5.20
   
  इंडियन ओव्हरसीज बँक 5.20 5.45
   
  जे & के बँक 5.25 5.45
   
  कर्नाटक बँक 5.10 5.40
   
  करूर वैश्य बँक 5.50 5.65
   
  कोटक बँक 5.60 5.75
   
  पंजाब & सिंध बँक 5.15 5.40
   
  पंजाब नॅशनल बँक 5.10 5.10
   
  साउथ इंडियन बँक 4.90 5.40
   
  स्टँडर्ड चार्टर्ड 5.40 5.40
   
  तमिळनाड मर्कंटाइल बँक 5.35 5.35
   
  टीएएससी बँक 6.00 5.85
   
  युको बँक 5.30 5.30
   
  यूनियन बँक 5.10 5.30
   
  येस बँक 6.00 6.25
  गृहकर्जासाठी निवडा योग्य बँक
  तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर सध्या युको बँक (UCO Bank) हा तुमच्यासाठी सर्वांत फायद्याचा पर्याय ठरू शकतो. या बँकेचा गृहकर्जासाठीचा व्याजदर सध्या 6.50 टक्के एवढा आहे. पिरॅमल कॅपिटल & हाउसिंग फायनान्स बँकेचा गृहकर्जासाठीचा व्याजदर सर्वांत जास्त म्हणजेच 10.50 टक्के एवढा आहे.
  लोकप्रिय बँकांचे दर
  UCO नंतर गृहकर्जावर सर्वांत कमी व्याजदर देणारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेचा गृहकर्जाचा व्याजदर 6.65 टक्के आहे. त्यानंतर एचडीएफसी, आयडीबीआय, पीएनबी हाउसिंग या बँकांचा (6.75 टक्के) नंबर लागतो. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड या सर्व बँकांचा व्याजदर सारखाच म्हणजे 6.90 टक्के आहे. अ‍ॅक्सिस, कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी या बँकांचा गृहकर्जासाठीचा व्याजदर 7 टक्के आहे.
  इतर बँकांचे दर
   
  बँक व्याजदर (%)
   
  बजाज फिनसर्व्ह 6.70
   
  बँक ऑफ महाराष्ट्र 6.80
   
  सेंट्रल बँक 6.85
   
  पंजाब नॅशनल बँक 6.95
   
  कॅनरा बँक 7.05
   
  आयओबी 7.05
   
  आयसीआयसीआय 7.10
   
  करूर वैश्य बँक 7.15
   
  टाटा कॅपिटल 7.15
   
  जीआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेड 7.24
   
  जे & के बँक 7.35
   
  साउथ इंडियन बँक 7.35
   
  कर्नाटक बँक 7.50
   
  इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स 7.60
   
  सुंदरम होम फायनान्स लिमिटेड 7.85
   
  फेडरल बँक 8.05
   
  डीबीएस बँक 8.10
   
  तमिळनाड मर्कंटाइल बँक 8.25
   
  आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स 9.00
   
  रिलायन्स होम फायनान्स 9.75
   
  सेंट्रल बँक हाउसिंग 9.95
  गृहकर्जाचे व्याजदर (All Banks Home Loan rates) तुमचा क्रेडिट स्कोअर, परतफेडीचा कालावधी या गोष्टींनुसार बदलू शकतात. आताचे हे सर्व दर 13 मे 2022 रोजी त्या-त्या बँकांच्या वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार आहेत. सर्व बँकांच्या व्याजदरांची एकाच ठिकाणी माहिती मिळाल्यामुळे तुम्ही योग्य तो निर्णय घेऊ शकाल.
  First published:

  पुढील बातम्या