मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Rate Today: 50000 रुपयांच्या जवळ पोहोचला सोन्याचा भाव, काय आहे चांदीचा दर?

Gold Rate Today: 50000 रुपयांच्या जवळ पोहोचला सोन्याचा भाव, काय आहे चांदीचा दर?

 सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold Rates Today) पुन्हा एकदा तेजी येण्यास सुरुवात झाली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर, डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.11 टक्क्यांनी वाढला आहे.

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर: सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold Rates Today) पुन्हा एकदा तेजी येण्यास सुरुवात झाली आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Gold Rate on MCX) वर, डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.11 टक्क्यांनी वाढला आहे. तर चांदीचे भाव 0.26 (Silver Rate Today) टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहेत.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, दिवाळीत सोन्याची मोठी विक्री झाली. सणासुदीचा हंगाम संपल्यानंतर आता लग्नसराई सुरू झाली आहे. अशा स्थितीत सोन्या-चांदीच्या किमतींना मागणी वाढल्याने आधार मिळतो. सोने पुन्हा एकदा हळूहळू 50,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दिशेने वाटचाल करत आहे.

जाणून घ्या काय आहे सोन्या-चांदीचा भाव

डिसेंबरच्या डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.11 टक्क्यांनी वाढून 49,093 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे आज चांदी 0.26 टक्क्यांनी घसरली. आज 1 किलो चांदीचा भाव 66,409 रुपये आहे.

हे वाचा-Go Fashion IPO:आजपासून कमाईची संधी!या आयपीओमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचं आहे का?

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोन्याचे दर

तुम्हाला जर सोन्याचांदीचे दर माहित करून घ्यायचे असतील तुम्ही घरबसल्या हे काम करू शकता. 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

हे वाचा-अजूनही पेट्रोल शंभरीपारच! घरबसल्या मोबाइलवरुन जाणून घ्या इंधनाचे दर

अशाप्रकारे तपासा सोन्याची शुद्धता

जर तुम्हाला आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून एक अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. 'बीआयएस केअर अ‍ॅप' (BIS Care app) च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरित तक्रार नोंदविण्याची माहितीही मिळेल.

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold price, Gold prices today