नवी दिल्ली, 01 जून: तुम्ही सोनेखरेदी (Buy Gold) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याचांदीच्या दरात (Gold & Silver Price) मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price Today) 46,200 रुपयांवरून कमी होऊन 45,740 रुपये प्रति तोळा झाला आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार चांदीचे दर (Silver Rate Today) 67,600 रुपये प्रति किलो आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर रेकॉर्ड हायवर (Record High) 56191 रुपये प्रति तोळावर होते. त्या हिशोबाने सोनं आता 10000 रुपये स्वस्त दराने मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते नवीन गुंतवणुकदारांना सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये एंट्री करण्याची ही चांगली संधी आहे. देशातील मुख्य शहरातील सोन्याचे दर देशातील मुख्य शहरात सोन्याचे दर घसरले आहेत. नवी दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 45,900 रुपये प्रति तोळा आहे. तर चेन्नईमध्ये घसरणीनंतर दर 44,100 रुपये प्रति तोळा आहे. वेबसाइटच्या मते मुंबईत (Gold Rates in Mumbai) 22 कॅरेट सोन्याचा दर 45,740 रुपये आहे. हे वाचा- केंद्र सरकार शेतकऱ्यांना देणार 15 लाख रुपये, तुम्हाला देखील करता येईल अर्ज 24 कॅरेट सोन्याचा भाव गुरुवारी 47,200 रुपये प्रति तोळावरून घसरून 46,740 रुपये प्रति तोळा झाला आहे. गुरुवारी चांदीचे दर 67,600 रुपये प्रति किलो आहेत. बुधवारी चांदीचे दर 68,000 रुपये प्रति किलोग्रॅम होते. हे वाचा- सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ, महिन्याभरात व्हाल मालामाल; वाचा सविस्तर जून महिन्यात किती उतरले सोन्याचे दर? एचडीएफसी सिक्योरिटीजच्या मते, जून महिन्यात आतापर्यंत सोन्याचे दर 2725 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. तर चांदीचे दर या कालावधीमध्ये 71850 रुपये प्रति किलोवरून 68148 रुपये प्रति किलो या स्तरावर पोहोचले आहेत. जून महिन्यात चांदीचे दर 3700 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.